जगात अनेक प्रकारचे साप आढळतात, त्यापैकी बरेच विषारी असतात. या विषारी सापांच्या दंशामुळे एका व्यक्तीचा क्षणार्धात मृत्यू होऊ शकतो. जगात अनेक अनोखे सापही आढळतात. आता सोशल मीडियावर एका विचित्र सापाचा फोटो व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. तुम्ही कधी शिंग असलेला साप पाहिला आहे का? होय, हे ऐकून कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. नुकताच दोन शिंगे असलेला साप दिसून आला आहे. याची चर्चा सध्या सर्वत्र रंगताना दिसतेय.

सध्या सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक साप धावताना दिसत आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सापाच्या डोक्यावर दोन शिंगे आहेत. या सापाच्या डोक्यावरील शिंगे पाहून व्हिडीओने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे. हा विचित्र साप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर

आणखी वाचा : शाळेत विद्यार्थ्यांसोबत माकडही गिरवतंय शिक्षणाचे धडे, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल!

हा व्हिडीओ ट्विटरवर @mitulg881 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये शिंग असलेला साप पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ एका शेतातला असल्याचं दिसतंय. ज्यात हा विचित्र साप वेगाने धावताना दिसतोय. हा साप पाहून लोकांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. काही लोक म्हणतात की हा कलियुगाचा चमत्कार आहे.

व्हिडीओतील शिंग असलेला साप पाहून अनेकांचा विश्वास बसत नाही. अखेर सापाच्या डोक्यावर शिंग कसे बाहेर येणार? असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहे. हा व्हिडीओ आणखी निरखून पाहिल्यावर हा साप इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा दिसतो. हा व्हिडीओ खोटा असल्याचे अनेकांचे मत आहे.

आणखी वाचा : माशासोबत सेल्फी घेतल्यानंतर फोन पाण्यात फेकला, मजेदार VIRAL VIDEO पाहाच!

मात्र या व्हिडीओमध्ये सापाच्या डोक्यावरचे शिंग स्पष्टपणे दिसत आहे. डोक्याच्या दोन्ही बाजूंना हॉर्नसारखे पसरलेले अवयव दिसतात. हे पाहिल्यानंतर लोक म्हणतात की हा शिंग असलेला साप आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्स मजेशीर कमेंटही करत आहेत.

आणखी वाचा : Viral Video : पार्टी करणाऱ्या लोकांना सिंहिणीने दिलं ‘सरप्राईज’, एका व्यक्तीच्या मागेच पडली!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : उगाच काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणत नाहीत…हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

सोशल मीडियावर काही लोक म्हणतात की, सापाने बेडूक खाल्ला असावा आणि सापाने बेडकाला तोंडात पकडले आहे, त्यामूळे हे बेडकाचे पाय दिसत आहेत. हा अनोखा साप पाहून अनेकांना आश्चर्य वाटत असले तरी मात्र हा व्हिडीओ खोटा आहे की खरा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळवंटी भागात असे साप आढळतात ज्यांच्या डोक्याला शिंगे असतात. या भागात आढळणाऱ्या सापाचे नाव वाइपर असून ते अत्यंत विषारी असतात. राजस्थानच्या वाळवंटात असे साप आढळणे सामान्य आहे.

Story img Loader