Viral video: जंगल सफारीचा अनुभव हा प्रत्येकासाठी खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हे अनुभवायचे असते. खरं तर, लोक जंगलात जाऊन धोकादायक प्राणी बघायला खूप घाबरतात. पण तरीही ते जंगल सफारी करतात. कारण वेगवेगळे प्राणी आणि त्यांचे जीवन जवळून पाहायला मिळते. मात्र, सफारीदरम्यान काही हिंस्र प्राणी वाहनाजवळ येऊन उभे राहून माणसावर हल्ला करण्याची वाट पाहत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे.असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल. सोशल मीडियावर सध्या आसाममध्ये आई अन् मुलीसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या पर्यटकांमध्ये जीप सफारी लोकप्रिय आहेत. हा रोमांचकारी उपक्रम अलीकडेच एका आई-मुलीच्या जीवावर बेतला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ आसाममधील केजीरंगा नेशनल पार्कचा आहे. जिथे नेशनल पार्क पाहण्यासाठी गेलेल्या जीपमधून माय-लेकी पडतात मात्र नशिबाने गेंड्याच्या हल्ल्यापासून बचावल्या जातात.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. जंगलाच्या मधोमध सफारी थांबल्यावर लोकांनी जंगलाच्या अप्रतिम दृश्याचे व्हिडीओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. एका पार्कमध्ये एक गेंडा जीपच्या मागे जात असल्याचे दिसत आहे. पर्यटकांसह तीन जीप गेंड्याच्या हल्ल्यापासून बचावासाठी उजवीकडे वळण घेण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. पहिल्या दोन जीपचा वेग वाढताच एक तरुण मुलगी आणि तिची आई मदतीसाठी ओरडत अचानक जमिनीवर फेकली जाते. त्यानंतर आणखी एक गेंडा पर्यटकांच्या वाहनाकडे धावत येतो. गेंड्याच्या भयंकर धक्काबुक्कीमुळे घाबरून तिसऱ्या जीपचा चालक सावधपणे पलटी करतो आणि पुढील धोका टाळतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >>शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @vani_mehrotra अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.