Man Sprays Deodorant On Gas Stove: आजच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंचं प्रमाण वाढत चाललंय. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. सोशल मीडियावर आपली कला सिद्ध करून अनेक इन्फ्लूएंसर यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. परंतु, काही जण याचा वापर अगदी थिल्लरपणा करण्यासाठी करतात.

अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्टंटचे व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. लोक कधी सार्वजनिक ठिकाणी तर कधी रस्त्यांवर जीवघेणे स्टंट करत असतात. तर मुद्दाम माहित असून आयुष्यावर बेततील अशा गोष्टी करायला जातात. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आणि काही व्ह्युज आणि लाइक्ससाठी ते स्वत:सह इतरांचा जीवही धोक्यात टाकायला मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या अशाच दोन मित्रांनी एक जीवघेणा स्टंट केलाय. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Shocking video 4 thousand people Resume For 50 Jobs In Pune Video Viralon social media
“बापरे अवघड आहे तरुणांचं” तुम्हीही नोकरीसाठी पुण्यात येण्याचा विचार करताय? हा VIDEO पाहून धक्का बसेल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Shocking video Mumbai Local Women Fought With Each Other At Dombivli Railway Station
“महिलांना आता पुरूषांची नाही महिलांचीच भिती” डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील खतरनाक VIDEO होतोय व्हायरल
Thief calmly hangs from window of moving train in dangerous stunt
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ सुसाट वेगाने धावणाऱ्या रेल्वेच्या खिडकीत निवांतपणे लटकतोय हा चोरटा; जीवघेण्या स्टंटबाजीचा Video Viral
Two dogs stood outside the door all night for roti
दोन श्वानांचा जगण्यासाठी संघर्ष; एका भाकरीसाठी ते रात्रभर दाराबाहेर उभे राहिले… PHOTO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली खंत
Parents congratulated their children for not coming home on time
‘पप्पा, मला माफ करा…’ मुलं वेळेवर घरी आली नाहीत म्हणून आई-वडिलांनी केला सत्कार… VIDEO पाहून येईल हसू

दोन मित्रांचा जीवघेणा स्टंट व्हायरल (Stunt Video Viral)

आगीजवळ डिओड्रंट वापरणे अत्यंत धोकादायक आहे कारण त्यात ज्वलनशील रसायने असतात ज्यामुळे स्फोट होऊ शकतो. तथापि, एका कॉन्टेन्ट क्रिएटरने त्याच्या मित्रासह स्वयंपाकघरात धोकादायक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्याने थेट गॅसच्या शेगडीवर डिओ स्प्रे केला. आणि त्यानंतर नेमकं काय घडतं यासाठी त्याने याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केला.

व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की दोघेजण स्वतःसाठी चहा बनवत आहेत. गॅसवर ठेवलेल्या दुधाने भरलेल्या भांड्यात ते साखर घालताना दिसले. पण त्यानंतर त्यांनी जो स्टंट केला तो भयानक होता. साखर घालताच एकाने डिओ घेऊन तो पेटत्या गॅस स्टोव्हवर स्प्रे केला. स्प्रे करताच आग झटक्यात वाढली. तरीही तो स्प्रे करतच राहिला. ज्वलनशील पदार्थाची फवारणी केल्यानंतर मंद आगीची तीव्रता वाढली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @zydus_wellnes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ७.१ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून केवळ रीलच्या क्रेझसाठी धोकादायक स्टंट केल्याबद्दल नेटकऱ्यांनी दोघांवर संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिल,”खतरो के खिलाडी”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “म्हणूनच मूलं खूप कमी जगतात.” तर एकाने “मग चहा झाली की नाही” अशी कमेंट केली.

Story img Loader