सध्याचे जग हे सोशल मीडियाचे जग आहे आणि आपणही त्यात जगत आहोत. धोकादायक कार स्टंट करण्यापासून ते पिस्तूल घेऊन नाचण्यापर्यंत, कन्टेंट क्रिएटर अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडतात. सध्या अशाच एका नवीन व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला तिच्या हातात लहान बाळाला घेऊन धुम्रपान करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

व्हिडिओ शेअर करताना दीपिका नारायण भारद्वाज या एक्स वापरकर्त्याने लिहिले, “या रील मॉन्स्टर्सच्या आजूबाजूच्या असलेल्या मुलांसाठी भयंकर वाईट वाटते.व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी रील शुट करते आहे. तिच्या हातात एक बाळ आहे व्हिडीओच्या सुरुवातीला तरुणीने कॅमेऱ्याकडे पाठ केली आहे. ती गाणे सुरू होता कॅमऱ्याकडे वळते आणि तोडांतून धूर हवेत सोडते. तिच्या हातात सिगारेट असल्याचे दिसते ज्याचे एक-दोन झुरके घेताना ती दिसते. व्हिडिओमध्ये बाळ खोकताना दिसते आहे. त्यानंतरही तरुणी गाण्याच्या बोल गाताना दिसत आहे.

हेही वाचा – “ही दोस्ती तुटायची नाय!”, पाण्यात वाहून जाणाऱ्या मित्राला वाचवण्यासाठी कुत्र्याने पाण्यात मारली उडी, पहा थरारक व्हिडिओ

या व्हिडीओसह आणखी एक पोस्ट शेअर करत भारद्वाज यांनी सांगितले की,व्हिडिओमधील लहान बाळ दुसऱ्याचे आहे. “ते तिचे बाळं नाही. आणखी गैरवर्तन आहे का हे पाहण्यासाठी तिचे प्रोफाईल स्कॅन केले परंतु हे बाळ इतर रीलमध्ये दिसत नाही. तिने कोणाचे तरी मूल घेतले असावे तिचे सर्व व्हिडिओ फक्त स्मोकिंगबद्दल आहेत.”

हेही वाचा – “एक चूक अन् खेळ खल्लास!” महाकाय अजगराने विळख्यात जखडले तरी हसतोय हा तरुण, पहा थरारक Viral Video

१७ जून रोजी शेअर केलेल्या व्हिडिओला ७,९८,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आणि त्या महिलेच्या विरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना, एका वापरकर्त्याने म्हटले, “ती आजारी आहे आणि बाल शोषणाचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “मी असे म्हणू शकतो की हे तिचे बाळ नाही आणि तिला बाळ कसे पकडावे हे माहित नाही. बाळालाही फारसे सुरक्षित वाटत नाही. आशा आहे की, पालक आपल्या मुलांना अशा बेजबाबदार लोकांना देणे थांबवतील.”

“तिचे मूल असो वा नसो..मला वाटते कायद्याने पाऊल उचलले पाहिजे,” असे तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.