Shocking Accident video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत असतात. हेच व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात. तसेच येथे आपल्याला असे काही व्हिडीओदेखील पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकित करतात. काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. सध्या असाच एक पश्चिम बंगालमधला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील. मात्र, यात नक्की चूक कुणाची आहे हे कळत नाहीये.

‘अतिघाई संकटात नेई’ असे म्हणतात, याचाच प्रत्यय आला आहे. काहीवेळा लोक घाईगडबडीत अशा चुका करतात की ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी चालकाला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते; तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. असाच एक अपघात समोर आला आहे.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
badlapur accident latest news in marathi
बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात

नेमकं काय घडलं?

पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वेगवान दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या एसयूव्हीला धडकताना दिसत आहे, त्यानंतर तिचा स्फोट होऊन आगीच्या गोळ्यामध्ये रूपांतर होते. दोन दुचाकीस्वारांमध्ये झालेल्या रेसिंग स्पर्धेदरम्यान हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. व्हिडीओमध्ये एक SUV चौकात उजवीकडे वळण घेताना दिसत आहे, ज्यामध्ये एक वेगवान दुचाकी वाहनाच्या समोरून जात आहे. यावेळी मागोमाग आणखी एक वेगवान दुचाकी रस्त्याच्या मधोमध असलेल्या एसयूव्हीला धडकते आणि मोठ्या स्फोटानंतर आग पकडते. या धडकेमुळे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतील प्रवासीही जखमी झाले. मात्र, यामध्ये नक्की चूक कुणाची? कारण बाईकस्वारही वेगात येत आहे आणि स्कॉर्पियो चालकानंही मधूनच गाडी काढली आहे. तुम्हीही पाहा व्हिडीओ आणि सांगा यात नेमकं कुणाचं चुकलं?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईच्या रिक्षात एकटी मुलगी पाहून करत होता ब्लॅकमेल; तरुणीने दाखवली भन्नाट हुशारी; प्रत्येक मुलीनं पाहावा असा VIDEO

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @aadharamos नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “सगळ्यांनी गाडी चालवताना काळजी घेतली पाहिजे.”

Story img Loader