कधी कधी अशा घटना घडतात की त्याची वैज्ञानिक कारणं शोधणंही आव्हानात्मक असतं. भरधाव वेगात येणारं ट्रक अंगावरून जाऊन देखील एक महिला सहीसलामत बचावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलेला खरचटलं सुद्धा नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकं ते पाहून थक्क झाले.
भल्यामोठ्या ट्रकनं धडक देऊन त्या व्यक्तीच्या अंगावरून ट्रक गेल्यानंतर त्याची काय अवस्था होईल, या विचारानंच काळजात धडकी भरते. त्या व्यक्तीच्या शरीराचं काय होईल, याची कल्पनाही सहन होत नाही. मात्र असाच अपघात होऊनही महिलेच्या साध्या केसालाही धक्का लागला नाही असं सांगितलं, तर साहजिकच कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
एका ट्रकनं या महिलेला उडवलं, ती महिला ट्रकच्या खाली गेली, तिच्यावरून तो ट्रक गेला पण तिला साधी जखमही झाली आहे. नशीब बलवत्तर म्हणून ही महिला वाचली. गेल्या आठवड्यात मंगळवारी मणिपालजवळ हा अपघात घडला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक महिला स्कूटीने रस्ता क्रॉस करत होती. तितक्याच बाजुने भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने तिच्या स्कूटीला धडक दिली. ती दूध घेऊन जात असताना हा भयंकर अपघात घडला होता. अपघातानंतर ही महिला रस्त्याच्या मधोमध पडली. आता या महिलेचा जीव जातो की काय अशी मनात भीती वाटत असताना व्हिडीओमध्ये पुढे जे दिसतं ते पाहून सारेच जण अवाक झाले.
इतक्या भयंकर अपघातानंतर ही महिला पडल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या डोक्यावरील हेल्मेट व्यवस्थित करते. महिलेने एकच चूक केली की, रस्ता ओलांडताना तिने उजवीकडे न पाहता स्कूटी पुढे ढकलली, त्याचवेळी दुसऱ्या बाजूने मिनी ट्रक भरधाव वेगाने येत होता. क्षणार्धात ट्रकने महिलेला धडक दिली. हेल्मेटमुळेच या महिलेचा जीव वाचला असंही म्हणता येईल. आजूबाजूच्या लोकांनी हा अपघात पाहिल्यानंतर ते घाबरले आणि तिच्या मदतीसाठी धावून आले.
आणखी वाचा : आईला वैतागून चिमुकलीने देवाकडे केली ही प्रार्थना, Viral Video पाहून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ‘कच्चा बादाम’वर शाळकरी मुलीने केला क्यूट डान्स, पाहा हा VIRAL VIDEO
जखमी महिलेच्या भोवती लोकांचा जमाव जमला, तिला मदत केली आणि तिला बसण्यासाठी खुर्ची दिली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यात कोणाची चूक आहे, यावर चर्चा केली. ३ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला आणि महिलेला धडकल्यानंतर ट्रक चालक न थांबता वेगाने पळताना या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आलं आहे.
मणिपाल पोलीस स्टेशनने या व्हिडीओबाबत चौकशी केली. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. हिट-अँड-रन अपघातानंतर या ट्रक चालकाची अद्याप ओळख होऊ शकली नाही. स्टेशन प्रभारी म्हणाले की, ‘महिलेने आमच्याकडे तक्रार केली नाही, त्यामुळे आम्ही वाहन किंवा चालकाची ओळख पटवली नाही.’