Viral Video Mother Saved Child : वाहन चालवताना अत्यंत सजग रहावे लागते. वाहन चालवताना आवश्यक काळजी घेतली पाहिजे विशेषत: जर तुमच्याबरोबर लहान बाळ किंवा लहान मुल प्रवास करत असतील तर जास्त सावध राहिले पाहिजे. आपली एक चूक आपल्यासह इतरांच्या जीवावर बेतू शकते. अशाच एका थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, दोन महिला एक लहान चिमुकली आणि एका बाळाला घेऊन स्कूटरने जात आहे. दरम्यान वेगाने येणाऱ्या ट्रकला धडकल्याने त्यांचा थरारक अपघात झाला हा हृदयद्रावक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हे भयानक फुटेज व्हायरल झाले आहे, ज्यामुळे ही दुर्घटना घडवून आणणाऱ्या धोकादायक युक्तीने प्रेक्षक थक्क झाले आहेत.
कोल्लममधील एका रस्त्यावर हा अपघात झाला जेव्हा स्कूटरला भरधाव वेगाने येणार्या ट्रकने मागे टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रक ड्रायव्हरला मागे काय चालले आहे याची जाणीव नसते. तो मागून येणार्या गाड्या आरशात न पाहाता साच वेगाने गाडी पळवतो. काही क्षणांनंतर, स्कूटर थोडीशी उजवीकडे सरकली आणि ट्रकच्या मागील बाजूला धडकते, ज्यामुळे त्याचे दुचाकीवरील सर्वजण रस्त्यावर पडतात.
अपघातामुळे दुचाकीवरील दोन महिला आणि लहान मुलगी थेट जमिनीवर फरफटत जातात. धक्कादायक गोष्ट म्हणजे एका महिलेच्या हातात बाळ असते. रस्त्यावर पडल्यानंतर ती फरफटत गेली तरीही लेकराला सोडत नाही ज्यामुळे त्या बाळाचा जीव वाचतो. हा भयानक क्षण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. दरम्यान एक स्कूटर चालवणारा एक माणूस ताबडतोब त्यांच्या मदतीसाठी धावतो. त्यानंतर लगेचच, स्थानिक लोक घटना स्थळी जमले आणि त्यांनी या धक्कादायक अपघातातून पीडितांना सावरण्यास मदत केली.
नेटकऱ्यांंनी व्यक्त केला रोष (Netizens expressed outrage)
सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु हे फुटेज भारतीय रस्त्यांवर बेपर्वा वाहन चालवणे आणि वेगाने गाडी चालवणे या धोक्यांची आठवण करून देणारे आहे.
व्हायरल व्हिडिओमुळे ऑनलाइन संतापाची लाट उसळली आहे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्ते सुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.
एका ‘एक्स’ वापरकर्त्याने लिहिले: “जर तुमच्याकडे फक्त स्कूटर असेल तर, अगदी आवश्यक असल्यास घराबाहेर पडा आणि बुलेटप्रूफ जॅकेटशिवाय युद्धभूमीवर असल्यासारखे वागा.”
दुसऱ्याने कमेंट केली: “ट्रक चालकांनाही तेवढाच किंवा त्याहूनही जास्त दोष द्यावा.. रस्त्याच्या उजव्या बाजूपासून डाव्या बाजूला लेन कापण्याचा त्याने चुकीचा निर्णय घेतला.. पण प्रत्येक दुचाकीस्वाराला हेल्मेट घालणे हा योग्य सल्ला आहे.”