प्रेम हे चिरंतन आणि शाश्वत असते. प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी प्रेम करतोच. पण प्रेम करताना सुरक्षा तेवढीच महत्वाची असते, याचा प्रेमीयुगलांना अनेकदा विसर पडतो. त्यातून कधीकधी प्राणही गमवावे लागतात. अशीच एक घटना समोर आली आहे. एक प्रेमीयुगल ५० फूट उंचीवर रोमान्स करत होते. त्यावेळी अचानक तोल जाऊन दोघांचा मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

ही दुर्दैवी घटना पेरूमध्ये घडली आहे. ५० फूट उंच ब्रिजवर प्रेमीयुगल रोमान्स करत होते. त्यांना जगाचा विसर पडला होता. अचानक तोल जाऊन खाली पडल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी घडली आहे. हेक्टर विडल(३६) आणि मेबेथ इस्पिनोझा (३४) असे त्या दुर्दैवी प्रेमीयुगलाचे नाव आहे. रात्री दोघेही बाहेर फिरायला गेले होते त्यावेळी एका ब्रिजवर चुंबन घेत होते. ब्रिजच्या ग्रीलवर मेबेथ बसली होती आणि हेक्टर उभा होता. दोघेही एकमेंकांच्या प्रेमात बुडाले होते. त्यावेळीच अचानक मेबेथचा तोल गेला. तिला वाचवण्यासाठी हेक्टर पुढे सरसावला मात्र त्याचाही तोल गेला. दोघेही ५० फूट उंच ब्रिजवरून खाली पडले. उपस्थित लोकांनी सांगितले की, ब्रिजवरून पडल्यानंतर दोघेही जिवंत. त्याना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.

Story img Loader