Shocking video: एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला आणि पुरुष अपार्टमेंटच्या खिडकीतून थेट खाली उडी मारताना दिसत आहेत. प्रत्यक्षात या जोडप्याच्या संपूर्ण घराला आग लागली आहे. आगीमुळे त्यांना मुख्य गेटमधून बाहेर पडणे कठीण झाले होते, आग इतकी भीषण आहे की त्यांचं संपूर्ण घर जळत होतं. आगीची माहिती आजूबाजूच्या लोकांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी येऊन या वृद्ध जोडप्याचा जीव वाचवला. मात्र यामध्ये धक्कादायक म्हणजे ही आग चुकुन लागली नव्हती तर या वृद्ध जोडप्याच्या नातीनेच ही आग लावली होती. आणि याचं कारण एकून तर तुम्ही थक्कच व्हाल.

मोबाईलसाठी ११ वर्षीय मुलीनं घर पेटवलं

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
dance video on Tambdi chamdi chamakte unat laka laka song
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लक’ तरुणाने साध्या-भोळ्या आईबरोबर केला जबरदस्त डान्स, Video एकदा पाहाच
Boy Spoils Sister's Rangoli Caught on CCTV
संधी साधली अन् बहिणीने काढलेली रांगोळी खराब केली, पण अशी झाली पोलखोल, VIDEO एकदा पाहाच

तुम्हाला हे एकून आश्चर्य वाटले असेल की घरात आग स्वतःहून लागली नाही तर या घटनेमागे एका ११ वर्षाच्या मुलीचा हात आहे. ही मुलगी या वृद्ध दाम्पत्याची नात आहे. वास्तविक, मुलगी ब्राझीलमधील इपनेमा येथे एका अपार्टमेंटमध्ये तिच्या आजी-आजोबांसोबत राहत होती. ५३ वर्षीय आजीने मुलीकडून फोन हिसकावला होता, त्यामुळे संतापलेल्या नातीने संपूर्ण घर पेटवून दिले. मुलीला आजीने मोबाईल हिसकावणे अजिबात आवडले नाही म्हणून तिने रागात थेट घरालाच आग लावली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धक्कादायक VIDEO व्हायरल

आता तुम्हाला हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल की आजीने नातीकडून मोबाईल का हिसकावला? या मागचे कारण असे की… खरं तर, आजीने तिच्या नातीचा मोबाईल तपासला तेव्हा तिला दिसलं की तिची गुगल सर्च हिस्ट्री ‘जादूटोणा’ लिंक्सने भरलेली होती, म्हणजे नात दिवसरात्र फक्त जादूटोणा शोधत बसायची. हे पाहिल्यानंतर आजीला चिंता वाटू लागली आणि तिने मोबाईल काढून घेतला..

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ऐ हालो…! डोंबिवलीतील गरबा उत्सवात किरीट सोमय्यांचा ठेका, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

नातीने सर्वात आधी हॉलमधल्या सोफ्याला आग लावली. यानंतर ती आजी-आजोबांच्या खोलीत गेली आणि आपण खेळण्यासाठी मैदानात जात असल्याचे सांगितले. सोफा पेटवून नात घराबाहेर गेली आणि आजी-आजोबा घराबाहेर पडू नयेत म्हणून खोलीला बाहेरून कुलूप लावले. सोफ्यावर लागलेली आग हळूहळू घरभर पसरली. जेव्हा घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आलं त्यावेळी आजी-आजोबांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला, मात्र खोलीला कुलूप असल्याचे त्यांना दिसून आले. सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की अग्निशमन विभागाने जमिनीवर जाड गादी पसरवली आणि वृद्ध जोडप्याला खिडकीतून उडी मारण्यास सांगितले. आजोबांनी उंचावरून थेट जमिनीवर उडी घेतली, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.