Viral video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण अनेकदा पाहतो.लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.

जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं

जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागतो. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…

घोडा आणि बकरी आमने-सामने आल्यावर काय होईल असं कुणी विचारलं तर सहाजीकच आपण म्हणू की घोडाचं बाजी मारेल. पण ज्याच्याकडे हिम्मत असते त्याला ताकदीची गरज नसते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घोडा आणि बकरीमध्ये भांडण होतं आणि बकरी घोड्याला अक्षरश:जमीनीवर लोळवते. कधी कधी आपल्याच ताकदीचा आपल्याला अंदाज नसतो मात्र हिम्मत केली की सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळेच म्हणतात, जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं. हेच या व्हिडीओतून पाहायला मिळालं. तुम्हीही हा व्हिडीओ नक्की पाहा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कबुतराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? बायकोनं मालवणीत घेतली नवऱ्याची शाळा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका छोट्याश्या बकरीनं घोड्याला माघार घ्यायला लावली हे पाहून सगळेच अवाक् झाले. सर्वजण बकरीच्या हिंमतीला दाद देत आहेत.सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @vip_thoughts99 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, “बकरीच्या जिद्दीला सलाम”, तर दुसरा युजर म्हणतो, “भीतीची भीती कशाला. अखेर ताकदीसमोर हिम्मत जिंकली”