पिंपरी-चिंचवड : बाळांतीण आईचे पाचवी पूजन आणि बाळाचे बारसं ही बाब सर्वश्रुत आहे. पण हेच पाचवी पूजन आणि बारसं घोडा या प्राण्याचं असेल तर ऐकून नवल वाटलं ना? पण पिंपरी चिंचवड लगतच्या नेरे गावात हे घडलं आहे. या गावात राहणाऱ्या जाधव कुटुंबियांनी आपल्या लाडक्या घोडीच्या गाभणाचा सोहळा केला आहे. जाधव कुटुंब शेतकरी असून त्यांच्याकडे गाय, बैल, म्हैस असे शेतीसाठी उपयोगी असणारे प्राणी आहेत. त्यातच भर म्हणून त्यांनी तीन वर्षांपूर्वी एक घोडी घेतली होती. या घोडीला काही दिवसांपूर्वीच पिलू झालं आहे. या घोडीचे आणि नवजात पिलाचे कौतुक करण्यासाठी जाधव कुटुंबियांनी तिचे आपल्या मुलीसारखे लाड केले आहेत. बाळाच्या जन्माला पाच दिवस झाल्यानंतर घोडीची पाचवी आणि नवजात पिलाचे जल्लोषात बारसे केले.

विशेष म्हणजे जाधव यांच्याकडे बैलांचे वाढदिवसही मोठ्या जल्लोषात केले जातात. प्राण्यांवर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाचे प्रेम असून कुटुंबातील सदस्याप्रमाणेच प्राण्यांची काळजी घेतली जाते. जाधव कुटुंबातील लोक सांगतात, शेतकरी असल्याने प्राण्यांची निगा राखणे जमते. आई असलेल्या लक्ष्मी नावाच्या घोडीने बारा महिने बारा दिवस पोटात वाढवलेल्या पिलाचे नाव हिरा ठेवण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी लक्ष्मी(घोडी)जाधव कुटुंबीयांची सदस्य झाली. मग तिच्यापासून आणखी एक पाहुणा घरी आणण्याचा निर्णय झाला आणि हिराचा जन्म झाला. या गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी जाधव कुटुंबाने पाचवी आणि बारशाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Muslim father card printed for hindu people at daughter wedding faces of hindu lord in amethi goes viral
PHOTO: मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; पत्रिकेवरील एका गोष्टीनं वेधलं लक्ष; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

पारंपरिक पद्धतीने दगडी पाट्यावर लक्ष्मीच्या पाचवीची पूजा तर पाळणा म्हणत हिराचा नामकरण सोहळा जाधव कुटुंबीयांनी केला. पाचवीला महिलांना खारीक-खोबरं असं पौष्टिक आहार भेट म्हणून आणलं जातं. लक्ष्मीला मात्र येणाऱ्या पाहुण्यांनी तिच्या आवडीचे खाद्यपदार्थ आणले होते. यावेळी जाधव कुटुंबियांचे नातेवाईक आणि मित्र मंडळी आले होते. अनेकांना तर हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. खरं तर घोडा या प्राण्याचा वापर खासकरून व्यवसायासाठीच केला जातो. पण जाधव कुटुंबीयांप्रमाणे पशुप्रेमी काही थोडकेच असतात. प्राण्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे माया देत समाजासमोर आदर्श निर्माण करणारे खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण करतात.