Horse Rescue Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्राण्यांना वाचवतानाचे व्हिडीओ समोर येत असतात. कित्येकदा एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याला घाबरून अशा जागी लपतात जिथून बाहेर पडणे त्यांना बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, एका घोड्याला वाचविले आहे. हा व्हिडीओ प्लोरिडामधील असल्याचे सांगितले जात आहे जिथे एक घोडा स्विमिंग पूलमध्ये अडकलेला दिसत आहे. त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही.

घोड्याला वाचवितानाचा व्हिडीओ व्हायरल

इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये युनायटेड पास्को काउंटी फायर रेस्क्यू डिपार्टमेंटला एका घोड्याला स्विमिंग पूलमधून बाहेर काढण्यात यश आले. खरं तर हा घोडा दुसऱ्या घोड्याला घाबरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो आणि त्याला बाहेर पडता येत नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की या घोड्याला दोरीने बांधून स्विमिंगपूलमधून बाहेर काढले आहे.

Bengaluru Crime News
Bengaluru : महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले, बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना; महिलेची आई म्हणाली, “घरमालकाने…”
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
boyfriend tries to convince his upset girlfriend on the road
रुसलेल्या गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी तरुणानं भर रस्त्यात काय केलं पाहा; सगळेच पाहू लागले अन् शेवटी…, VIDEO झाला व्हायरल
Viral Video
Kanpur Viral Video : चोरट्याने देवाला आधी जल अर्पण केलं अन् मग चोरला कलश; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video
Super Typhoon Yagi Videos
Super Typhoon Yagi: खिडक्या आणि गाड्या उडाल्या, झाडं-घरं कोलमडली; चक्रीवादळाच्या तडाख्यात व्हिएतनाममध्ये हाहाकार
protest against netyanahu in israel
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये आंदोलन पेटले; कारण काय? मारले गेलेले सहा ओलिस कोण होते? त्यांची हत्या का करण्यात आली?
old man suicide rumour, lohmarg Police,
ठाणे : प्रवाशांसोबतच्या वादानंतर वृद्धाने आत्महत्या केल्याची अफवा; अफवांवर विश्वास ठेवू नका, लोहमार्ग पोलिसांचे आवाहन

हेही वाचा – शरद पवार ते बाळासाहेब ठाकरे; महाराष्ट्राच्या नेत्यांचे AI अवतार पाहिले का? अमित वानखेडे यांनी तयार केले भन्नाट AI Photo

त्या घोड्याच्या शरीराला दोरी बांधून ट्रॅक्टरच्या साहाय्याने पूर्णवर उचलले जाते आणि नंतर जमिनीवर ठेवले जाते. व्हिडीओ शेअर करताना अग्निशमन दलाने लिहिले की, तलावात उडी मारून अडकलेल्या घोड्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १.६ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. एका यूजरने या व्हिडीओवर लिहिले की, मला खूप आनंद झाला आहे की सर्व काही ठीक झाले, बचाव पथकाने खूप चांगले काम केले.

हेही वाचा- कुत्र्यालाही आवरता आला नाही पावसात भिजण्याचा मोह! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले,”याला म्हणतात खरा आनंद”

यापूर्वीही चिखलात अडकेल्या घोड्याला वाचवले होते

मात्र, अशा परिस्थितीत अडकलेल्या प्राण्यांना वाचवण्याची ही पहिलीच वेळ नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत ज्यात चिखलात अडकल्यानंतर प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. याआधीही अमेरिकेतील टेक्सासमध्ये याच रेस्क्यू टीमने चिखलात अडकलेल्या एका घोड्याला वाचवले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक बचाव पथकाचे कौतुक करत आहेत.