माणसांप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा भावना असतात आणि त्यांना देखील आपल्या कुटुंबापासून लांब जाणं खूप असतं. आपल्या कुटुंबात जर कोणी आजारी असेल तर आपण त्याची काळजी घेतो. त्याला रुग्णालयात घेऊन जातो. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक घोडा रुग्णालयाच्या पाठी धावताना दिसत आहे. हा व्हिडीओ उदयपुरमधील आहे. व्हिडीओत असलेला घोडा त्याच्या आजारी बहिणीला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिकेचा पाठलाग करताना दिसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला आहे. त्याने जवळपास २ किलोमीटरपर्यंत त्या घोड्याचा पाठलाग केला. जो पर्यंत रुग्णालयापर्यंत पोहोचत नाही तो पर्यंत तो घोडा धावत राहिला. पण हा घोडा ८ किलोमीटर लांब पर्यंत धावत आला होता.
आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…
आजपर्यंत तुम्ही शर्यतीत अगदी वेगाने धावणारे आणि राजेशाही थाटात वावरणारे घोडे पाहिले असतील. पण याच घोड्याला अशा प्रकारे कोणत्या रुग्णवाहिकेच्या पाठी धावताना पहिल्यांदाच पाहिलं असेल. अगदी माणूस जसा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या चिंतेत सगळं सोडून रुग्णालयात धावतो त्याच प्रमाणे हा घोडा धावत आहे.