Sprite Bottle Placed To Patient Instead Of Urine Bag Viral Video : देशी जुगाड करून भन्नाट प्रयोग केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण चक्क रुग्णालयात धक्कादायक जुगाड करून रुग्णाला यूरीन बॅग लावण्याऐवजी चक्क स्प्राईट बॉटल लावली. मेडिकलच्या योग्य साहित्याचा वापर न करता रुग्णाला लघवी करण्यासाठी स्प्राईट बॉटल दिल्याचा भयानक प्रकार उघडकीस आल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. बिहारच्या जामुई येथील सदर रुग्णालयात ही भयंकर घटना घडली असून रुग्णाला लघवीसाठी स्प्राईटची बॉटल लावण्याच्या प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा संतापजनक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
@utkarshSingh नावाच्या यूजरने रुग्णालयाचा हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, यूरीन बॅगऐवजी रुग्णाला लावली कोल्ड्रिंकची बाटली. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना टॅग करून आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था झाल्याचं या पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. बिहारच्या जमुई सदर रुग्णालयातील फोटो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, अशाप्रकारचे स्प्राईटची बॉटल का लावण्यात आली? एमरजन्सी रुग्णाला मेडिकल साहित्य उपलब्ध असल्याने असा प्रकार घडला असावा.
इथे पाहा रुग्णालयातील धक्कादायक व्हिडीओ
रुग्णालयात रुग्णांच्या उपचारासाठी उत्तम सुविधा नसल्याने स्थानिक लोकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. या रुग्णालयातील व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा नसल्याने रुग्णांना उपचारादरम्यान नाहक त्रास सहन करावा लागतो. रुग्णाचा योग्य वेळी उपचार न झाल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने रुग्णालयात उत्तम सुविधा दिल्यास रुग्णाचं आरोग्य निरोगी राहू शकतं, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.