सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. दर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हिडिओ, पोस्टर किंवा पाट्या व्हायरल होतात. यामध्ये कधी खळखळून हसायला भाग पाडणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावणाऱ्या पुणेरी पाट्या चर्चेत येत असतात तर कधी समाजातील परिस्थितीवर भाष्य करणारे पोस्टर चर्चेत येत असतात.

सध्या अशाच एका हॉटेलच्या नावाची पाटी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. हॉटेलचे नाव इतके विचित्र आहे की ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. हा व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणे अशक्य होत आहे. हॉटेलचे नाव हे नवऱ्या-बायोकाच्या नात्यावर प्रकाश टाकणारे आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा –झोमॅटोच्या फूड रेस्क्यूबाबत ग्राहकाने मांडले मत, सीईओ गोयल यांनी दिली थेट नोकरीची ऑफर, पोस्ट चर्चेत

दुकानाच्या नावाची पाटी चर्चेत

पती-पत्नीचे नाते हे कधी प्रेमाचे तर कधी रुसव्या फुगव्याचे असते. पती-पत्नीमध्ये तसे छोटे-छोटे वाद होत असतात पण कधी मोठे भांडण झाले तर नवऱ्याची मात्र पंचायत होते कारण चहापासून जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पती हा पत्नीवर अवलंबून असतो पण जेव्हा दोघांमध्ये भांडण होते तेव्हा मात्र नवऱ्याला घराबाहेर जाऊन हॉटेलमध्येच जेवावे लागते.बायकोबरोबर भांडण झाल्यानंतर पोटभर जेवण देणारे हॉटेल नवऱ्यांसाठी दुसऱ्या पत्नीपेक्षा कमी नाही हे सांगणारी पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पत्नी पत्नीच्या नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीची भूमिका पार पडणारे हे हॉटेल म्हणजे पत्नीसाठी एखाद्या सवतीप्रमाणेच असते. व्हायरल पोस्टमध्ये दुकानाच्या नावाची एक पाटी दिसत आहे जी पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हॉटेल दुसरी बायको असे दुकानाचे नाव देण्यात आले आहे. त्याखाली चायनीज, जेवण असे पर्याय लिहलेले दिसत आहे. व्हायरल पाटी वाचून नेटकरी हसू येत आहे.

हेही वाचा –“जय-वीरू!” दलाल स्ट्रीटवर स्विगीची एन्ट्री, झोमॅटोने केलं स्वागत! पाहा, Netflix, Amazon, Paytm, Coca Colaची भन्नाट प्रतिक्रिया

येथे पाहा पोस्ट

https://www.instagram.com/reel/DCJ7fa2IP2f/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

हेही वाचा –“बड़ी मुश्किल बाबा, बड़ी मुश्किल” गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स, थेट माधुरी दीक्षितला दिली टक्कर, Viral Video एकदा बघाच

व्हिडिओ इंस्टाग्रामवर editor_sonu_xx नावाच्या पेजवर शेअर केले आहे. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आता हेच बघायचं पाहिलं होतं! हे हॉटेल कुठे आहे असा प्रश्न काही नेटकरी विचारत आहे पण अद्याप याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोस्टवर हसण्याचे इमोजी पोस्ट केल्या आहेत.

Story img Loader