इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (AHAR), हॉटेल उद्योगाची सर्वोच्च संस्था, गुरुवारी मुंबईच्या वाकोला पोलिसांशी संलग्न असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर (API) ने हॉटेल कर्मचार्‍यांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की काय झालं?

मध्यरात्रीनंतर अन्न आणि अल्कोहोल देण्यास नकार दिल्याबद्दलचा एपीआयने वाकोला हॉटेलमध्ये कॅशियरला मारहाण करताना दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना वाकोला पोलीस स्टेशनच्या जवळ मध्यरात्री १२. ३०च्या सुमारास गुरुवारी घडली.

हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडीओनुसार, पोलिस अधिकारी विक्रम पाटील कॅशियरकडे जातात, त्यांचा शर्ट ओढतात आणि त्याला थप्पड मारतात, तर व्यवस्थापक आणि रेस्टॉरंटचे कर्मचारी त्याला अडवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.

(हे ही वाचा: धक्कादायक! KFC च्या डीशमध्ये महिलेला सापडले तळलेले कोंबडीचे डोकं; फोटो viral)

हॉटेलवाले फुकट फुड आणि ड्रिंक्स देण्यास नकार दिला कारण त्याचं करोना नियमावलीनुसार किचन बंद करायची वेळ झाली होती. यावर पोलिस संतापले होते.

(हे ही वाचा: Video: मानवी वस्तीत शिरलेल्या दोन सिंहानी बैलाला घेरले, मग काय झाले ते तुम्ही बघाच…)

(हे ही वाचा: कृतज्ञता! रस्ता ओलांडण्यासाठी गाडी थांबवणाऱ्याचे हत्तीने अनोख्या पद्धतीने मानले आभार; Video Viral)

या घटनेवर भाष्य करताना AHAR चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले, “आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो ज्यामुळे केवळ पोलीस दलाचेच नाव खराब होत नाही तर स्थानिक व्यापारी मालकांचा स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींवरचा विश्वास उडाला आहे. रेस्टॉरंट मालकांना त्यांचा व्यवसाय शांततेने चालवण्याशिवाय आणखी काही नको आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतो की अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांवर कारवाई सुरू केली जावी ज्यामध्ये कायदा करणारे कायदा मोडणारे बनतात.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hotelier beaten by police for refusing free meals and drinks incident captured on cctv ttg