तुम्ही बर्फाचा गोळा खाल्ला आहे का कधी? खाल्ला असेल तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल की, कसा बर्फाचा तुकडा मशीमध्ये टाकून किसला जातो आणि त्या किसलेल्या बर्फाचा गोळा कसा तयार होतो. ल हानपणापासून आपण बर्फाच्या या लाद्या विक्रेत्यांकडे पाहत आलो आहोत. रस्त्याच्या कडेला असलेले ज्यूस असो की लिंबूपाणी, हा बर्फ सर्वत्र वापरला जातो. वस्तू थंड ठेवण्यासाठी देखील दुकानदार बर्फाचे तुकडे वापरतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे बर्फाच्या लाद्या नक्की कशा तया होतात.
बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की, हे बर्फाच्या लाद्या अस्वच्छ पाण्यापासून तयार होतात. म्हणूनच हा बर्फ खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. बाजारात मिळणाऱ्या या बर्फाबाबत अशा अनेक गोष्टी सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पण या गोष्टी कितपत खऱ्या आहेत? याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला बर्फाच्या कारखान्यातील एक व्हिडिओ दाखविणार आहोत जे पाहून तुम्हाला हे समजेल की, बर्फ कसा तयार केला जातो.
मोठे मशीन चालू करून बर्फ तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते. हे यंत्र गोठवणारा वायूला थंड करतो. हा थंड वायू एका मोठ्या टाकीमध्ये साठविला जातो जो एका वेळी सुमारे १३०० बर्फाच्या लाद्या गोठवू शकतो. आता बर्फाचे साचे बुडविण्यासाठी वापरल्या जाणार्या पाण्यात मीठाचे अनेक तुकडे जोडले जातात. यानंतर साचे स्वच्छ केले जातात आणि मीठ विरघळलेल्या पाण्यात ओळीने ठेवले जातात. खाऱ्या पाण्यात साचे सलग टाकल्यानंतर ते आरओ पाण्याने (स्वच्छ पाणी) भरले जातात. यानंतर, खाऱ्या पाण्याखालून जाणार्या कूलिंग कॉइलमधून थंड वायू सोडला जातो, ज्यामुळे खारट पाणी थंड होते आणि त्याच्या थंडपणामुळे, साच्यात भरलेले पाण्याचा बर्फ तयार होतो. त्यानंतर हुकच्या साहाय्याने हे साचे बाहेर काढले जातात आणि त्यातून बर्फ काढून तो वाहनात भरून बाजारात पाठवला जातो.
हेही वाचा – पहिल्यांदा बिकिनी व्हॅक्स करण्याचा विचार करत आहात? मग तुम्हाला ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी माहित असल्याच पाहिजेत
ourcollecti0n या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ”आश्चर्यकारक बर्फ ब्लॉक फ्रीझिंग फॅक्टरी प्रक्रिया.” फॅक्टरीत बर्फाचा ब्लॉक कसा तयार होतो ते तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. व्हिडीओ पाहून लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काही लोक ही प्रक्रिया पाहून थक्क झाले आहे तर काहींनी ही प्रक्रिया पाहून स्वच्छता आणि सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला.