Viral video: महागड्या हॉटेल/रेस्टॉरंटमध्ये कधी कसले पैसे घेतील सांगता येत नाही. कधी एका उकडलेल्या अंड्यासाठी २०० रुपये घेतले जातात तर कधी एक साधं सँडविचसुद्धा दोन ते तीन हजार रुपयांत विकलं जातं. मात्र, प्रत्यक्षात तो पदार्थ समोर आल्यावर त्याची इतकी किंमत असूच शकत नाही हे लक्षात येतं. अशी कित्येक प्रकरणं आजवर तुम्ही पाहिली असतील, ज्यामध्ये ग्राहकांकडून दाम दुप्पट पैसे वसूल केले गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आणखी एक नवं प्रकरण समोर आलं आहे. अनेकांना हॉटेलमध्ये जेवण करताना ड्रिंक्स किंवा सरबत वगैरे पिण्याची आवड असते. खरं तर यामध्ये वाईट असं काही नाही. पण, हॉटेलमध्ये कुठलंही ड्रिंक्स ऑर्डर करताना थोडं सावध राहा, कारण तुमची फसवणूक होऊ शकते. हीच फसवणूक टाळण्यासाठी आणि नक्की फसवणूक कशी होते यासाठी तुम्हीही हा व्हिडीओ पाहा.

फसवणूकीची नवी ट्रीक

आपल्याला माहितीच आहे हॉटेलच्या जेवणात सोडा वापरला जातो. कारण कमी जेवूनही ग्राहकांचं पोट लवकर भरावं, यामुळे त्यांना जेवणाची जास्त कॉंटीटी द्यावी लागत नाही आणि कमी जेवणात ग्राहकांचं पोट भरतं आणि हॉटेलचा फायदा होतो. मात्र, आता ग्राहकांना फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी नवीन ट्रीक शोधून काढली आहे.

महागड्या ड्रिंक्समध्ये अशी होते फसवणूक

हॉटेल्स, बार किंवा पबमध्ये वेगवेगळे ड्रिंक्स देण्यासाठी जे ग्लास वापरले जातात ते काचेचे असतात, त्यामुळे दिसायला छान दिसतात. अनेकदा या ग्लासांचा आकार त्रिकोणी असतो. पण, या आकारातच खरी फसवणूक आहे. कारण त्रिकोणी आकारामध्ये खालचा भाग निमुळता असतो, त्यामुळे त्या ग्लासामध्ये आपल्या नेहमीच्या गोल ग्लासांच्या तुलनेत कमी पदार्थ मावतो आणि ही गोष्ट आपल्या लक्षातसुद्धा येत नाही. त्यामुळे हॉटेलवाले एका गोल ग्लासात मावेल इतका पदार्थ दोन त्रिकोणी ग्लासांमधून देऊन त्यात बर्फाचे मोठे तुकडे टाकतात, त्यामुळे ग्लासही पूर्ण भरतो आणि डबल पैसे वसूल करतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल तुमची कितीवेळा फसवणूक झालीय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “विजय नेहमी शांततेत मिळवायचा” बैलगाडा शर्यतीचा थरार; ओव्हरटेक करीत क्षणात कशी जिंकली शर्यत, एकदा पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर er_pankaj_sir नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. फक्त ड्रिंक्समध्येच नाहीतर दारू खरेदी करतानाही हल्ली फसवणूक मोठ्या प्रमाणात होते.

दारू खरेदी करताना काय काळजी घ्याल?

बनावट दारू बनवणारे इतके हायटेक झाले आहेत की ते बनावट दारूचा रंग, चव आणि वास अशा प्रकारे तयार करतात की जणू ती खरी दारू आहे. मात्र, असे असतानाही थोडी काळजी घेतल्यास बनावट दारू ओळखता येते. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही दारू खरेदी कराल, तेव्हा अधिकृत दुकानातूनच खरेदी करा. अधिकृत दुकानातून दारू विकत घेतल्यास बनावट दारू मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. यासोबतच तुम्ही बनावट दारू त्याच्या पॅकेजिंगवरूनही ओळखू शकता. तुम्हाला दिसेल की बनावट दारूचे पॅकेजिंग खूपच खराब असेल आणि त्याच्या नावाचे स्पेलिंगदेखील गोंधळात टाकणारे असेल. यासोबतच बनावट दारूच्या बाटल्यांचे सीलही अनेकदा तुटलेले दिसतील.