ऑफिसला रोज उशीरा आणि रोज बॉसचा ओरडा खाणे हे सर्व प्रायव्हेट जॉबमध्ये होते. पण सरकारी कार्यालयाबाबत सांगायचे तर येथे उशीरा येणाऱ्यांचे किस्से सामान्य गोष्ट आहे. ही चूक समोर आल्यानंतर नोटीस पाठवली जाऊ शकते आणि पुन्हा कर्मचारी आपल्या उशिरा येण्याचे कारण देतो. असेच काहीसे जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही झाले आहे. उशीरा ऑफिसला येणाऱ्या कर्माचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे ज्यानंतर कर्मचाऱ्याने असे उत्तर दिले की सगळीकडे त्याची चर्चा होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर, जयपूर विद्युत वितरण निगम लिमिटेडच्या सहाय्यक मुख्य अभियंत्याने कोटा विभागातील एका डिस्कॉम कर्मचाऱ्याला उशिरा पोहोचल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवली. ज्यानंतर कर्मचाऱ्याने असे उत्तर दिले की ते वाचून लोक हसू लागले. त्याचवेळी कर्मचाऱ्याच्या उत्तरामुळे नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणजे सहायक मुख्य अभियंता यांनाही गोत्यात टाकले आहे.ऑफिसमध्ये उशिरा येण्याचे कारण कर्मचाऱ्याला विचारले असता, ‘तुम्ही स्वत: कधीच वेळेवर येत नाही. त्यामुळे मीही वेळेवर येत नाही. आता या कर्मचाऱ्याचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले

JVVNL कार्यालयाचे विभागीय मुख्य अभियंता व कोटा विभागाचे सहायक मुख्य अभियंता जीएस बेरवा आणि DISCOM च्या कोटा JPD (IA Rev.) कार्यालयातील CA-द्वितीय पदावर नियुक्त कर्मचारी अजित सिंह यांच्यामध्ये घडलेले हे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. त्याचे झाले असे की. ऑफिसमध्ये उशीरा येण्याबद्दल बेरवा यांनी सिंह यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. सिंह यांनी या नोटिसचे उत्तर असे दिले की बेरवा थक्क झाले असून आता त्यांच्यावरही चौकशीची टांगती तलवार लटकत आहे.

हेही वाचा – काय सांगता! Mumbai Airport बाहेरील चक्क २० भटक्या कुत्र्यांना मिळाले आधार कार्ड, QR कोड स्कॅन करून आता ओळखणे शक्य

असे संपूर्ण प्रकरण आहे

१४ जुलै रोजी मुख्य अभियंता जी.एस. बैरवा यांनी कार्यालयाची अचानक पाहणी केली तेव्हा या प्रकरणाला सुरुवात झाली. यादरम्यान, त्यांना सकाळी ९.४५ वाजता आयए कार्यालयात सीए २ अजित सिंग त्यांच्या सीटवर दिसले नाहीत. हजेरी नोंदवहीत त्यांची सही नव्हती. अजित सिंग गैरहजर आढळून आल्याने मुख्य अभियंता यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. १७ जुलै रोजी अजित सिंह यांनी मुख्य अभियंत्यांच्या नोटीसला उत्तर दिले.

मुख्य अभियंता जी.एस.बैरवा यांनी सांगितले की, ”त्यांच्या अंतर्गत जवळपास १२ विभाग आहेत. १४ जुलै रोजी अचानक तपासणी केली असता सुमारे ५० कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. कर्मचारी अजित सिंह यांनाही वेळेवर कार्यालयात न आल्याने नोटीस देण्यात आली होती. ही नोटीस त्यांना आज डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी दिली. त्यांनी नोटीसला उद्धट भाषा वापरून लेखी उत्तर दिले. अजित सिंह यांनी उत्तरात लिहले की ,”तुम्ही स्वत: कधी वेळेवर येत नाही म्हणून मीही वेळवर येत नाही”. त्यांनी कारवाईसाठी वरिष्ठांना पत्र दिले आहे.

हेही वाचा – कुत्र्यांपासून वाचवून बिबट्याच्या पिल्लांना शेतकऱ्याने नेले घरी, नाराज IFS अधिकारी म्हणाले….

आता दोघांची चौकशी केली जाईल

कर्मचारी अजित सिंह यांनी सहाय्यक मुख्य अभियंता यांना त्यांचे उत्तर पाठवले ज्यांनी १७ जुलै २०२३ रोजी नोटीस जारी केली होती. त्यांनी त्यांच्या लेखी नोटीसच्या तळाशी त्यांची स्वाक्षरी आणि तारीखही टाकली आहे. त्यानंतर ही गोष्ट अधिकृत रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यासह आता सहाय्यक मुख्य अभियंताही चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले असून आता अधिकारी आणि कर्मचारी दोघांचीही चौकशी केली जाणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How cause notice given to discom employee his answer goes viral snk