दिवाळी म्हटलं की फटाके हे हमाखास आठवतात. फुलबाजा, भुईचक्र, पाऊस, लवंगी, लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब सारखे विविध प्रकारचे फाटके असतात. यापैकी काही फटाके कमी आवजाचे असतात तर काही कानटाळ्या बसवणारे असतात. तुम्ही देखील लहानपणापासून फटाके वाजवले असतील किंवा पाहिले असतील. या फटक्यांपैकी लवंगी फटाका मोठ्या प्रमाणात दिवाळीत वापरला जातो. लवंगी फटक्यांची १००ची माळ, ५००ची माळ किंवा हजारी माळ अशी मिळते. म्हणजे एका माळेत किती फटाके असतात त्यावरून ही संख्या ठरते पण तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय की हा लवंगी फटाके कसा तयार होत. आज आम्ही तुम्हाला लवंगी फटाका कसा तयार केला जातो हे सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये लवंगी फटाका तयार करण्याची पद्धत दाखवली आहे. व्हिडीओच्या सुरवातीला एक महिला रद्द कागदाच्या अगदी बारीक वळकुट्या करत आहे. त्यानंतर त्या लाल रंगाच्या वळकुट्यांना उन्हात वाळवले जाते. त्यानंतर त्या गोळा करून त्याते लवंगीच्या आकाराचे तुकडे केले जातात. त्या तुकड्यांना एका गोलाकार रिंगमध्ये दाबून भरल्या जातात. त्यानंतर त्या ठोकून त्याची पातळी समान केली जाते. त्यानंतर त्याला एका बाजूने ओली माती लावून बंद केले जाते आणि उन्हात वाळवले जाते. नंतर दुसऱ्या बाजूने त्यात फटक्यांची दारू भरली जाते. त्यानंतर प्रत्येक फटाक्यात वाती टाकल्या जातात. त्यानंतर त्या पक्क्या झाल्या की त्या रींगचे मातीचे आवरण फोडून टाकतात आणि तयार लवंगी फटाके एका ठिकाणी साचवतात. त्यानंतर त्याच्या वाती एकमेकांमध्ये गुंफून १००, ५००, १००० पर्यंत माळा तयार केल्या जातात.

हेही वाचा – सायकल चालवतात तशी बाईक चालवतेय ही तरुणी; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

व्हायरल व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहे. फटाके फोडताना कोणीही विचार केला नसेल की त्यासाठी काही लोक इतकी मेहनत घ्यावी लागत असेल. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तुमचा आनंद हा कोणाच्यातरी उत्पनाचे साधन आहे.”व्हायरल व्हिडीओवर लोकांनी पसंती दर्शवली आहे.