Viral Video if Flood : केरळमधील वायनाड येथे ३० जुलै रोजी पहाटे भूस्खलन झाले. दुर्घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी ढिगाऱ्याखालून मृत आणि जिवंत लोकांना बाहेर काढण्याचे बचाव कार्य सुरु आहे. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. केरळपाठोपाठ उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे, ज्यामध्ये १४ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक बेपत्ता आहेत. नदीला आलेल्या पुरामुळे भूस्खलन झाले आणि रस्ते आणि पूल वाहून गेले. केदारनाथ यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. मदतकार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. प्रचंड ढगफुटीमुळे शिमला, मनाली ते कुल्लूपर्यंत भीषण विध्वंस झाला आहे. कुल्लूमधील मणिकर्ण व्हॅली, शिमलाजवळील रामपूर, बुशहरमधील मंडी आणि झाकरी परिसरात एकूण तीन ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. ढगफुटीमुळे पाण्यासह वाहून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे तिन्ही ठिकाणचे रस्ते, घरे उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य दिसत आहेत. नद्यांमधील पाणी तुंबले आहे. देशातच नव्हे तर जगभरात नैसर्गिक आपत्ती आल्याचे अनेक घटना समोर येत आहे. दरम्यान जून महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले. स्वित्झर्लंडमधील पुरास्थिती दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हेही वाचा – भरधाव वेगाने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून धावत होता ट्रक…पुढच्याक्षणी जे झाले ते पाहून उडेल थपकाप, Video Viral

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
india railway viral news Husband-Wife Fight
नवरा-बायकोतील भांडण अन् रेल्वेचे तीन कोटींचे नुकसान! OK मुळे चुकीच्या स्थानकावर पोहोचली ट्रेन; नेमकं घडलं काय? वाचा…
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Young boy bite dog video viral on social media shocking and funny video
VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला कचाकचा चावला; हल्ला करताच रागावलेल्या तरुणानं घेतला बदला, पण शेवट…

पूर कसा येते हे दर्शवणारा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वित्झर्लंडमधील पूरांच्या उसळत्या लाटा कशाप्रकारे सर्वकाही उद्धवस्थ करू शकतो हे दर्शवत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱी थक्क झाले आहे. डोंगराळ भागातून प्रचंड मोठा पाण्याचा प्रवाह वाट मिळेल त्या दिशेने वाहताना दिसत आहे. वाटेत येणारा प्रत्येक दगड, माती तो स्वःताबरोबर वाहून घेऊन जात आहे. क्षणार्धात पाण्याचा मोठा प्रवाहा पूराचे भयंकर रुप कसे घेत आहे हे तुम्ही पाहू शकते. व्हायरल व्हिडिओ अवघ्या १५ सेंकदाचा आहे. नेटकऱ्यांच्या काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – “आजीला मानलं पाहिजे राव!” वय झालं तरी रोज सायकल चालवत कामाला जातात आजीबाई, Viral Video एकदा बघाच

वायनड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सध्या अशीच पुरस्थिती उद्भवली आहे. पाण्याच्या प्रवाहाबरोबर डोंगर वाहून जात आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन होत असून थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. नैसर्गिक आपत्ती क्षणार्धात सर्वकाही कसे उद्भवस्त करू शकते हेच या व्हिडीओमधून दिसते आहे. निसर्गाला हानी पोहचवणाऱ्या अनेक चूका माणूस करत असतो. पण शेवटी निसर्ग आपला रुद्रावतार धारण करतो ज्यामध्ये अनेक कुटुंब उद्धवस्थ होतात.