Viral Video if Flood : केरळमधील वायनाड येथे ३० जुलै रोजी पहाटे भूस्खलन झाले. दुर्घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी ढिगाऱ्याखालून मृत आणि जिवंत लोकांना बाहेर काढण्याचे बचाव कार्य सुरु आहे. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. केरळपाठोपाठ उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे, ज्यामध्ये १४ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक बेपत्ता आहेत. नदीला आलेल्या पुरामुळे भूस्खलन झाले आणि रस्ते आणि पूल वाहून गेले. केदारनाथ यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. मदतकार्याला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. प्रचंड ढगफुटीमुळे शिमला, मनाली ते कुल्लूपर्यंत भीषण विध्वंस झाला आहे. कुल्लूमधील मणिकर्ण व्हॅली, शिमलाजवळील रामपूर, बुशहरमधील मंडी आणि झाकरी परिसरात एकूण तीन ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. ढगफुटीमुळे पाण्यासह वाहून आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे तिन्ही ठिकाणचे रस्ते, घरे उद्ध्वस्त झाल्याचे दृश्य दिसत आहेत. नद्यांमधील पाणी तुंबले आहे. देशातच नव्हे तर जगभरात नैसर्गिक आपत्ती आल्याचे अनेक घटना समोर येत आहे. दरम्यान जून महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले. स्वित्झर्लंडमधील पुरास्थिती दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
कसा येतो भयावह पूर? काळजात धडकी भरवणारा ३५ सेंकदाचा Video Viral
स्वित्झर्लंडमधील पुरास्थिती दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. How did floods occurs
Written by ट्रेंडिंग न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-08-2024 at 15:09 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did floods occurs a 15 second scary video of gone viral snk