भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडून इतिहास रचला आहे. देशात आतापर्यंत दिलेल्या करोनाविरोधी लसींच्या डोसची संख्या १०० कोटींच्या पुढे गेली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताने इतिहास रचला आहे, हा भारतीय विज्ञान, उद्योग, भारतीयांच्या सामूहिक भावनेचा विजय आहे असे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसा घाठला १०० कोटीचा टप्पा?

ऑक्टोबरमध्ये भारताने दररोज सरासरी ५.३ दशलक्ष डोस दिले. १९ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर पर्यंत, सरासरी दैनंदिन डोस किंचित सुधारून ६० दशलक्ष झाले. ९६० दशलक्ष पात्र लोकांसाठी लसीकरण सुरु केले गेले तेव्हा भारताची सुरुवात मंद गतीने झाली.

मे महिन्यात १९.७२ लाख लसीकरण झाले तर जून महिन्यात ३९.०३ लाख. जुलै महिन्यात लसीकरणाचा आकडा ४१.१७ वर पोहचला तर ऑगस्ट महिन्यात ५४.९१ लाख लसीकरण झाले. सप्टेंबर महिन्यात ७६.४५ लाख लसीकरण झाले.

कोणत्या लसींचा वापर?

जानेवारी महिन्यात को-व्हक्सीन देण्यास सुरुवात झाली. याचवेळी कोविशील्ड ही लसही देण्यास सुरुवात झाली. १२ एप्रिलला भारतात स्पूतनिक ही लस देण्यास सुरुवात झाली. ३० जूनला MRNA-1273 तर ७ ऑगस्ट रोजी जॉनसन एंड जॉनसन सिंगल डोस लस आणि २० ऑगस्ट रोजी ZYCOV-D या देशातील पहिल्या डीएनए आधारित लस १२ वर्ष आणि त्याच्या वरच्या वायच्या मुलांसाठी देण्याचे ठरले.

रचला रेकॉर्ड

१ सप्टेंबर रोजी १.३३ करोड लसीकरण झाले होते तर १७ सप्टेंबर रोजी २.५ करोड लसीकरण झाले होते.

कोणत्या देशात किती लसीकरण झाले?

भारताने १०० कोटीचा टप्पा पार केला आहे. तर अन्य देशात अजून ५० कोटीही लसीकरण पूर्ण झालेले नाही. संयुक्त राज्य अमेरिकात ४१.०१ करोड लसीकरण झाले आहे. त्या पाठोपाठ ब्राजिलमध्ये २६.०२ करोड लसीकरण झाले आहे.

/

पंतप्रधान मोदींनी १०० कोटींच्या लसीकरणाचा टप्पा पार केल्यानंतर या संदर्भात ट्वीटही केले आहे. “भारताने इतिहास रचला आहे. आम्ही भारतीय विज्ञान, उद्यम आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. १०० कोटी लसीकरण पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि प्रत्येकाने ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्यांचे आभार,” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे लसीकरण मोहीम पुढे नेल्याबद्दल आरोग्य कर्मचाऱ्यांचे सतत कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did india reach the milestone of 100 crore vaccinations find out ttg