What bird has electric powers? : भल्या पहाटे उठून तुम्ही कधी बाहेर आलात तर तुम्हाला विजेच्या तारांवर किंवा झाडांच्या फांद्यावर अनेक पक्षी सरळ रेषेत बसलेले किंवा झोपलेले दिसतात. पण झोपेतही हे पक्षी खाली पडत का नाहीत? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? झोपेत या पक्ष्यांचा तोल जात नसेल का? तोल जात असेल तर झोपेत असतानाही ते आपला तोल कसा सांभाळतात? असे अनेक प्रश्न या पक्ष्यांकडे पाहिल्यावर उपस्थित होतात. याच प्रश्नांची उत्तरे आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. यामागे एक शास्त्रीय कारण आहे.
पक्षी जेव्हा झोपलेले असतात तेव्हा त्यांचे दोन्ही डोळे बंद नसतात. त्यांचा एक डोळा उघडात असतो. उघड्या डोळ्यांमुळे त्यांचा अर्धा मेंदू सक्रिय राहतो. या सक्रिय मेंदूच्या मदतीने ते फांदीवर किंवा तारेवर आपला तोल सांभाळतात. म्हणजेच, पक्ष कधीही गाढ झोपेत नसतात. त्यांची झोप जागरूक असते. म्हणजेच, आजूबाजूला काही घडलं की त्यांना लगेच जाग येते. त्यामुळे फांदीवर किंवा तारेवर झोपताना त्यांचा सहसा तोल जात नाही. याशिवाय, पक्ष्यांच्या पायांची रचना अशाप्रकारे आहे की ते कुठेही बसले तर तिथे आपली पकड घट्ट करून बसतील. त्यामुळे त्यांचा तोल जाण्याची शक्यता कमी असते.
हेही वाचा >> Video: परिस्थिती सगळं काही शिकवते! चिमुकल्याची इच्छाशक्ती पाहून नेटकरी म्हणतात; लेक असावा तर असा…
पक्षी तारेवर का बसतात?
पक्ष्यांची सहज शिकार होऊ शकते. त्यामुळे ते अशा ठिकाणी बसतात जिथून त्यांना कोणीही मारणार नाही. त्यामुळे झोपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा म्हणजे विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारा. माणसांसाठी या तारा धोकादायक असतात. त्यामुळे पक्षी याच तारांवर अगदी सुरक्षित राहू शकतात. त्यामुळे ते आराम करण्यासाठी, झोपण्यासाठी आणि बसण्यासाठी तारांचा वापर करतात.
हेही वाचा >> सेन्ट्रल जेल की रेस्टॉरंट? पोलीस घेतात ऑर्डर तर कैदी वाढतात जेवण, वाचा काय आहे प्रकरण
पक्ष्यांना शॉक लागत नाही का?
पक्ष्यांना विजेच्या तारांवर विजेचा धक्का बसत नाही. पक्ष्यांच्या शरीरातून वीजप्रवाहही जात नाही. कारण, जेव्हा पक्षी विजेच्या तारेवर आपले दोन्ही पाय ठेवून बसतात, तेव्हा त्यांच्या पायांमध्ये समान विद्युत क्षमता असते. त्यामुळे वीजेचा प्रवाह पक्ष्यांच्या शरीरातून जाऊ शकत नाही.