Viral video: ग्राहकांना वस्तू विक्री करताना ती कमी वजनाची देऊन फसवणूक केली जाते. अनेक ग्राहकांना हा प्रकार लक्षात येत नाही. तर काही ग्राहकांना फसवणुकीचा प्रकार लक्षात येऊनही वेळेअभावी तक्रार करत नाही. ग्रामीण भागात असे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. ग्राहकांकडून संपूर्ण पैसे वसूल करून मापात पाप केले जाते. अनेक दुकानदार वजन आणि मापामध्ये फसवणूक करतात. मात्र, अशी फसवणूक होऊ नये, यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधित विभागाकडे तक्रार करणे आवश्यक आहे. दरम्यान अशाच फसवणूकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजीवाले ग्राहकांना कशी लावतात शेंडी?

बऱ्याचदा बाजारपेठेतील विक्रेते मापात पाप करून ग्राहकांची फसवणूक करतात. काट्यामध्ये कमी वजनाने दगड वापरून दिशाभूल करतात. तर मापातही ठोकपीट करून फसवणूक करतात. दरम्यान असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक फळ विक्रेता कशाप्रकारे वजनात फसवणूक करतो हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

वजनात फसवणूक करताना पाहून अवाक् व्हाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक विक्रेता तराजूमधून फळं वजन करताना कशी फसवणूक केली जाते हे सांगत आहे. यात विक्रेता सांगतोय की, विक्रेते लोकांना फसवणुकीचे बळी कसे बनवतात. मालाचे वजन करताना विक्रेता तराजूच्या स्केलचा एक भाग साखळीला जोडलेला सर्वात वरचा नट फिरवतात, सामान्य भाषेत ज्याला काटा मारणे म्हणतात. तराजूचा एक स्केल फिरवल्याने १ किलोच्या मालात सुमारे २०० ग्रॅम माल कमी होतो. कधीकधी ते ३०० ग्रॅमपर्यंत कमी होते. पण, विक्रेत्यांची काटा मारण्याची ही पद्धत अनेक ग्राहकांना माहीत नाही, त्यामुळे वस्तू खरेदी करताना ग्राहक फक्त तराजूच्या मधल्या सुईकडे लक्ष ठेवतात. पण, तराजूचा स्केल म्हणजे वरच्या आट्याकडे लक्ष नसते. अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक होते.त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी नागरीकांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO : भयंकर! जमिनीवर पाडले, लचके तोडले; ती किंचाळत राहिली अन्…मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर १५ कुत्र्यांचा हल्ला

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ imranmalik077 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत. काही जण या प्रकारावर संतापले आहेत. तर, काही जणांनी तरुणानं सतर्क राहून हा प्रकार निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्याचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How do shopkeepers cheat desi jugaad video viral on social media srk
First published on: 25-06-2024 at 13:19 IST