आईस्क्रीम हा सगळ्यांचा आवडता थंडगार पदार्थ आहे. आईस्क्रीम खाणार का? असं विचारलं तर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच अशा अनेक फ्लेवरमध्ये आईस्क्रीम तुमच्या परिसरात तुम्हाला सहज मिळतात. अशातच कोन, कप, मटका आणि विविध आकारात आईस्क्रीम तुम्हाला सहज दिसतात. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तुम्हाला आईस्क्रीम कोन कारखान्यात कसे बनवले जातात याची झलक दाखवण्यात आली आहे.
आईस्क्रीम कोन पूर्णपणे मशीनच्या साहाय्याने बनवण्यात आले आहे. एका वर्तुळाकार साच्यात हे सर्व आईस्क्रीमचे रिकामी कागद एक कामगार ठेवतो आहे. नंतर मशीनच्या सहाय्याने चॉकलेट आईस्क्रीम या प्रत्येक कागदामध्ये टाकलं जात आहे. त्यानंतर टप्याटप्याने सगळ्यात शेवटी त्यावर कागद लावला जातो आहे. कारखान्यात चॉकलेट कोन आईस्क्रीम कसे तयार होतात एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
हेही वाचा…मुंबईत काळ्या मुंग्यांचा सरबत होतोय व्हायरल; पिण्यासाठी लोकांची गर्दी, पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, मशीनच्या सहाय्याने कोन बनवण्याची प्रक्रिया अगदी सहज केली जाते आहे. तसेच काही कामगार देखील यादरम्यान मदत करताना दिसत आहेत. त्यानंतर यंत्राद्वारे शेवटी छोट्या- छोट्या बास्केटमध्ये हे चॉकलेट कोन विक्रीसाठी तयार करून ठेवले जात आहेत. अगदीच स्वछ आणि छान पद्धतीत चॉकलेट आईस्क्रीम कोन बनवण्याची ही पद्धत तुम्हाला देखील नक्कीच आवडेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @denish.tanna’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काही नेटकरी हा व्हिडीओ पाहून हे ‘त्यांच आवडत आईस्क्रीम आहे’ असे आवर्जून सांगत आहेत. तसेच काही जण ‘हा कारखाना कुठे आहे’ ; असे प्रश्न युजरला कमेंटमध्ये विचारताना दिसत आहेत. तसेच सोशल मीडियावर आईस्क्रीम प्रेमी या व्हिडीओला पसंती दाखवताना दिसत आहेत.