Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. काही व्हिडिओ तर खूप काही नवीन गोष्टी शिकवतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जीवनात सातचा पाढा किती महत्वाचा आहे, हे सांगितले आहे. या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की सातच्या पाढ्यात येणाऱ्या प्रत्येक आकड्यांचा सबंध जीवनातील विविध टप्प्यांबरोबर जुळविण्याचा प्रयत्न केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपण प्रत्येकजण शाळेत असताना पाढे शिकलोय. आणि आजही हे पाढे आपल्याला तोंडपाठ येतात. असा क्वचितच कोणी असेल की ज्याला १ ते १० पर्यंतचे पाढे येत नसेल. तुम्हाला सातचा पाढा सुद्धा माहिती असेलच. पण या व्हिडीओमध्ये सातच्या पाढ्याचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. हो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्पा ओलांडताना तुम्हाला नेहमी सातचा पाढा नेहमी आठवेन.

हेही वाचा : “निसर्गात खेळा पण निसर्गाशी खेळू नका” एक छोटीशी चुक त्यांचा जीव गमावू शकते, किल्ले विसापूरचा VIDEO पाहून येईल अंगावर काटा

या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला एका वहीचे पान दिसेल. या पानावर सातचा पाढा लिहिला आहे आणि प्रत्येक अंकासमोर आयुष्यातील विविध टप्प्यांविषयी माहिती सांगितली आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

“जीवनात सातचा पाढा फार महत्त्वाचा आहे.
७×१ = ७ बालपण
७×२ = १४ वयात येण्यास सुरुवात
७ ×३ = २१ लग्नाचे वय
७×४ = २८ मुलं बाळ
७ ×५ = ३५ सुखी संसार
७ ×६ = ४२ मुलांचे शिक्षण
७×७ = ४९ मुलांचे लग्न
७×८= ५६ नातवंडाचे सुख
७×९ = ६३ म्हातारपणाला सुरुवात
७ ×१० = ७० देवाचे नामस्मरण

किती अर्थपूर्ण आहे हा पाढा म्हणून हसत खेळत प्रेमाने रहा…. सर्वांना ७ द्या आणि सर्वांची ७ घ्या. हम ७-७ है…”

हेही वाचा : VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू

pawarsachinraj या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “२८च झालो, पोर बाळ तर सोडा इकडे प्रेयसीपण नाही” तर एका युजरने लिहिलेय, “खरं आहे भावा” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान आहे” एक युजर लिहितो, “खरंच आज सातचा पाढा नव्याने शिकलो.”