How India ‘Swiggy’d’ in 2023 : भारतीय आणि त्यांचे अन्नावरचे प्रेम याची महती जगभरात प्रसिद्ध आहे. एखादा सण असू दे, एखादी पार्टी किंवा मग अजून काही, जेवायला काय आहे याकडे सगळ्यांचे विशेष लक्ष असते. अशात जर कुठला खास दिवस, क्रिकेटची मॅच किंवा न्यू इयर पार्टी असेल तर स्टार्टर्सपासून डेझर्टपर्यंत सर्व काही आपल्याला हवे असते. मनाला वाटेल ते आणि हवे तेव्हा आपण आपल्या फोनमध्ये असणाऱ्या फूड डिलिव्हरी ॲपवरून आपल्या पोटाची इच्छा पूर्णदेखील करत असतो.

अशातच स्विगीच्या ‘हाऊ इंडिया स्विगी’ड २०२३’ [How India Swiggy’d 2023] या अहवालानुसार, भारतीयांनी या वर्षात किती आणि कोणते पदार्थ सर्वाधिक ऑर्डर केले आहेत, याबद्दल माहिती दिली आहे. या माहितीनुसार ‘झाशी’ आणि ‘भुवनेश्वर’ हे एका दिवसात सर्वाधिक पदार्थ मागवण्यात अगदी वरच्या स्थानावर आहे. याला कारणही तसेच आहे. ‘झाशी’ आणि ‘भुवनेश्वरमधील काहींनी, २०२३ या वर्षातील सर्वात मोठ्या पार्टीची ऑर्डर दिल्याचे समजते. दोन्ही शहरांमधील काही घरात नक्कीच दणक्यात पार्टी करण्यात आली होती, असे त्यांच्या एका दिवसाच्या ऑर्डर केलेल्या आकड्यांवरून समजते. त्यांनी नेमके किती पदार्थ ऑर्डर केले होते ते सर्वात शेवटी सांगितले आहे.

Cricket At Olympic 2028 Likely To be Moved Out of Los Angeles to maximise viewership in India
Olympic 2028: भारतामुळे Olympic 2028 मधील क्रिकेट सामने लॉस एंजेलिसमध्ये होणार नाहीत? वाचा कारण
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
india census
जनगणना पुढील वर्षी; पुढील लोकसभा निवडणूक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर घेण्याचा विचार
chavadi nana patole future congress performance in maharastra assembly poll
चावडी : बिनधास्त नाना
Dev Uthani Ekadashi 2024 Date in Marathi | Kartiki Ekadashi 2024 Date
Dev Uthani Ekadashi 2024 Date : यंदा कार्तिकी एकादशी नेमकी कधी आहे? जाणून घ्या, कोणत्या तारखेपासून सुरू होणार शुभ कार्य?
Ranji Trophy 2024 -25 Mumbai beats Maharashtra by nine wickets
Ranji Trophy : मुंबईचा महाराष्ट्रावर दणदणीत विजय, ९ विकेट्सनी धूळ चारत नोंदवला हंगामातील पहिला विजय
IPL 2025 Mega Auction Big Update on Venue and Dates
IPL 2025 Mega Auction च्या तारीख आणि ठिकाणाबद्दल आली मोठी अपडेट, जाणून घ्या कधी-कुठे पार पडणार लिलाव?
Sreejaya Ashok Chavan News
Sreejaya Chavan श्रीजया चव्हाण भाजपाकडून लढवणार निवडणूक, वडील अशोक चव्हाण म्हणाले, “आता तिला…”

हेही वाचा : बापरे! नवीन वर्षात मिळणार एवढे लॉन्ग वीकेंड्स! २०२४ च्या सर्व सुट्ट्यांचे आत्ताच प्लॅनिंग करून घ्या, पाहा…

नवीन वर्षचे आगमन आपण अगदी जोशात साजरे करतो. अनेकांच्या घरात पार्ट्या ठेवलेल्या असतात आणि या पार्ट्यांचे मूळ आकर्षण असते ते म्हणजे स्वयंपाकघरात असणारे अन्नपदार्थ. अर्थातच, या दिवशी सगळेच घरी शिजवलेलं अन्न खाण्यापेक्षा बाहेरून पदार्थ मागवणे पसंत करतात. असे असताना अनेक ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲप्स वापरले जातात. त्यापैकी स्विगीने या लेखामधील ‘२०२३ चे राष्ट्रीय अन्न दिवस’ [National Food Days 2023] नावाच्या एका तक्त्यामध्ये, यंदा कोणत्या दिवशी सर्वाधिक अन्न पदार्थ मागवले गेले आहेत, याची रंजक माहिती दिली आहे. ती नेमकी काय आहे ते पाहा.

२०२३ मध्ये भारतीयांनी स्विगीवरून मागवलेल्या पदार्थांची यादी

१. १ जानेवारी २०२३

‘उद्यापासून पुन्हा डाएट सुरू’ असे म्हणत नवीन वर्षाच्या १ तारखेलाच, तब्बल ४.३ लाख बिर्याणी आणि जवळपास ८३.५ हजार नूडल्सची ऑर्डर दिली असल्याचे समजते.

२. मदर्स डे

मातृदिन साजरा करण्यासाठी सर्व भारतीयांनी केकची निवड केल्याचे दिसते. १४ मे २०२३ रोजी चॉकलेट केकची सर्वाधिक विक्री झाली आहे.

३. ऑगस्ट

खाद्यपदार्थांची यादी आणि त्यामध्ये गुलाबजाम नाही? असं कसं होईल? तर ३० ऑगस्ट रोजी सर्वांनी आपल्या लाडक्या गुलाबजाम या मिठाईचा भरभरून आस्वाद घेतला असल्याचे दिसते. त्यासोबतच २० ऑगस्ट रोजी सर्वाधिक बटर नान मागवले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

४. वर्ल्ड कप फायनल्स

विराट आणि रोहितच्या जोडीसारखीच, पिझ्झा आणि क्रिकेट मॅचची जोडीदेखील सगळ्यांच्या आवडीची आहे. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी रंगलेल्या वर्ल्डकप सामन्यादरम्यान टीव्हीच्या स्क्रीनवरून लक्ष काढून घेणं शक्यच नव्हतं; त्यामुळे त्या दिवशी भारतात दर एका मिनिटाला पिझ्झाच्या तब्ब्ल १८८ ऑर्डर्स येत असल्याचे स्विगीच्या अहवालानुसार समजते.

हेही वाचा : सोशल मीडियावर ‘Delulu’ हा शब्द नक्कीच पाहिला असेल; आता Gen-Z च्या ‘या’ सात शब्दांचे अर्थ पाहा

त्यासोबतच झाशीमधील एका घरातून, एका दिवसात २६९ पदार्थांची ऑर्डर देण्यात आली असून, त्या पाठोपाठ भुवनेश्वरमधील एक घरातून, एका दिवशी २०७ पिझ्झाची ऑर्डर दिल्याचे समजते.