तुम्हाला आइस्क्रिम खायला आवडते? उन्हाळा असो की हिवाळा थंडगार आइस्क्रिम खाण्याची मज्जा काही वेगळी असते. तुम्हाला आइस्क्रिम खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही काय करता? बाजारात जाऊन पटकन हवे ते आइस्क्रिम घेऊन येता. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हे आइस्क्रिम कसे तयार केले जाते? नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहा. सोशल मीडियावर चॉकलेट आइस्र्क्रिम स्टिक तयार करण्याचा फॅक्टरीमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चॉकलेट आइस्र्क्रिम स्टिक फॅक्टरी व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात चॉकलेट आइस्क्रिम स्टिक्स कसे तयार केले जाते हे दिसते आहे. हा व्हिडिओ X हँडल सायन्स गर्ल या एक्स अकांऊटवर पोस्ट केला आहे. हे मूळत: जॉर्ज अर्टेगा यांनी २०२१ मध्ये इंस्टाग्रामवर शेअर केले होते. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” मॅग्नम आइस्क्रीम कसे बनवले जातात.”

व्हिडीओमध्ये दिसते आहे की, चॉकलेट आइस्क्रिम स्टिक बनवण्याची प्रक्रिया दाखवली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एका मशीनमधून स्टिक लावलेले आइस्र्क्रिम दिसत आहे. ते आइस्र्क्रिम एका धावत्या ब्लेटवरुन पुढे जात आहे, त्यानंतर मशीन द्वारे एक- एक आइस्क्रिम स्किट पकडून ती चॉकलेटमध्ये बुडवले जात आहे. त्यानंतर ते मशिनद्वारे पॅक केले जात आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क होऊन जाल.

आइस्क्रीमशी संबंधित हा व्हिडिओ पहा:

हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आला होता. तेव्हापासून सुमारे १४ दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिले आहे. ही संख्या अजूनही वाढत आहे.

हेही वाचा – Fact Check : लाठीचार्जचा व्हायरल व्हिडिओ उत्तराखंडमधील हलद्वानीचा नव्हे तर मुंबईतील घाटकोपरचा! जाणून घ्या काय आहे सत्य?

आइस्क्रीम मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जात असलेल्या या व्हिडिओबद्दल X वापरकर्त्यांनी काय म्हटले?

“हे खूप आकर्षक आहे,” असे एकाने व्हिडीओ पाहून लिहिले. दुसऱ्याने म्हटले “व्वा. छान प्रक्रिया. स्वादिष्ट दिसते,”

“का माहित नाही पण हे पाहणे समाधानकारक आहे,” तिसऱ्याने कमेंट दिली.

“काहीतरी मसालेदार खाल्ल्यानंतर आइस्क्रीमला चव येते,” चौथ्याने व्यक्त केले.

“मला याची चव चाखता येईल का,” पाचव्याने लिहिले

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How is ice cream made in a factory a viral video captivates people snk
Show comments