उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामधील एका व्यक्तीबरोबर एकदा नाही तर दोन वेळा सायबर फ्रॉड म्हणजेच ऑनलाइन फसवणुकीचा प्रयत्न झाला. त्याच्या खात्यावरुन १० हजार रुपये काढण्याचा प्रयत्न ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी केला. मात्र या व्यक्तीच्या खात्यावर ९ हजार ९९९ रुपये ९९ पैसे असल्याने ट्रॅनझॅक्शन झालं नाही. या व्यक्तीला पैसे काढण्याचा प्रयत्न झाल्यासंदर्भात मेसेज आला आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

नक्की वाचा >> बापरे! ‘या’ देशात ६० हजार रुपयांना मिळतं कंडोमचं एक पाकीट, कारण…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनिल कुमार असं या नशीबवान व्यक्तीचं नाव असून तो ग्रेटर नोएडामधील डारीन गावचा रहिवाशी आहेत. ते नोएडामधील एका कंपनीमध्ये काम करातत. २ जून रोजी सुनिल यांनी आपल्या एका नातेवाईकाला २२ हजार रुपये ऑनलाइन ट्रानझॅक्शनने पाठवले. मात्र हे पैसे पाठवताना चुकीचा खाते क्रमांक वापरल्याने अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर हे पैसे गेले. सुनिल यांनी तातडीने बँकेला संपर्क करुन मदत मागितली असता बँकेने हात वर केले. त्यानंतर सुनिल यांनी बँकेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला टॅग करुन आपली तक्रार ट्विटरवरुन मांडली. हे ट्विट पाहून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी सुनिल यांचा माग काढला.

तुमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आम्ही फोन केलाय असं सांगून फसवणूक करणाऱ्यांनी सुनिल यांना एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितलं. या अ‍ॅप्लिकेशनवरुन सुनिल यांच्या बँकेच्या खात्यासंदर्भातील माहिती मिळवल्यानंतर या फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या खात्यामधून दोन हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्यांना यश आलं नाही.

नक्की वाचा >> गाडीत प्रियकरासोबत सेक्स करताना झाला लैंगिक आजार; विमा कंपनी देणार ४० कोटींची नुकसानभरपाई

त्यानंतर ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी १० हजार काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेस सुनिल यांना मेसेजवरुन पैसे काढण्याचा प्रयत्न झाला असून तुमच्या खात्यावर केवळ ९ हजार ९९९ रुपये ९९ पैसे शिल्लक असून १० हजार काढता येणार नाही असं सांगणारा इनसफिशिएंट बॅलेन्स दाखवणारा मेसेज आला. केवळ एक पैसा कमी असल्याने सुनिल यांच्या खात्यावरुन फसवणूक करणाऱ्यांना १० हजार रुपये काढता आले नाहीत, असं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

नक्की वाचा >> लग्नानंतर मित्राच्या सल्ल्याने एवढ्या व्हायग्राच्या गोळ्या खाल्ल्या की…; उत्तर प्रदेशमधील विचित्र घटना

यानंतर सुनिल यांनी थेट नोएडा सायबर पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How just 1 paisa less in bank account saved this noida man from online fraud scsg