Optical Illusion Latest Image : आयुष्याचं कोडं सोडवण्यासाठी लोक नोकरी किंवा कामानिमित्त रोजची धावपळ करत असतात. परंतु, यामध्ये काही माणसं अशी असतात जी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल इल्यूजन टेस्टमध्ये जिंकण्यासाठी तल्लख बुद्धीचा वापर करतात. परंतु, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका नवीन फोटोमुळे सर्वच चक्रावले आहेत. कारण रंगीबेरंगी पक्षांच्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमुळे अनेकांना बुद्धीला चालना द्यावी लागणार आहे. सुंदर पक्षांना पाहिल्यावर मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. पण आता याच पक्षांनी सर्वांना कोड्यात टाकलं आहे. कारण झाडाच्या एका फांदीवर किती पक्षी बसले आहेत, हे सांगणं तितकं सोपं नाहीय. ज्या माणसांची नजर तीक्ष्ण आहे आणि बुद्धी तल्लख आहे, अशा लोकांनाच झाडावरच्या पक्षांची संख्या मोजता येणार आहे.
मेंदू आणि मन सक्रीय ठेवण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्ट देणं गरजेचं आहे. कारण अतिशय अवघड पद्धतीत मांडणी केलेल्या या फोटोमध्ये अचूक संख्या ओळखणं सर्वांनाच शक्य नाही. त्यामुळे फोटोत असलेल्या पक्षांची संख्या मोजणे बुद्धीमान व्यक्तींनाच शक्य होईल. जे लोक या टेस्टला सोपं सजमत असतील, त्यांच्यासाठी हे खूप आव्हानात्मक असणार आहे. १० सेकंदात पक्षांची संख्या सांगणारा विजेता ठरेल. त्यामुळे तुमच्याकडे ही टेस्ट जिंकण्यासाठी खूपच कमी वेळ आहे. दिलेल्या वेळेत तुम्हाला झाडावर बसलेल्या पक्षांची संख्या अचूकपणे सांगता आली पाहिजे. तुमची वेळ सुरु झाली आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मेंदूला चालना देऊन ही टेस्ट जिंका.
तुमची वेळ संपलेली आहे. आता किती जणांनी अचूक उत्तर दिलं आहे, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ज्या माणसांकडे बुद्धीला चालना देण्याची क्षमता आहे, त्यांनी पक्षांची संख्या बरोबर सांगितली असेल, असं आपण समजूया. मात्र ज्यांना या टेस्टमध्ये अपयश आलं आहे, त्यांना अशा टेस्टचा सराव करण्याची आवश्यकता आहे. इंटरनेटवर व्हायरल होणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची टेस्ट देणे सोपे असते, पण या टेस्टमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी तुमच्याकडे तल्लख बुद्धीच असावी लागते.