इंटरनेटवर नेहमी ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. या फोटोंमध्ये दडलेलं रहस्य शोधण्यात अनेकांच्या बुद्धीचा कस लागतो. तल्लख बुद्धीसह गरुडासारखी नजर असल्यावरच तुम्हाला फोटोंमधील बारीक सारीक गोष्टी समजतील. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनं सोशल मीडियावर अनेकांच्या बुद्धीला चालना मिळाली नाहीय. कारण, व्हायरल झालेल्या या फोटोत हत्तींचा कळप नदी किनाऱ्यावर उभा असलेला दिसतो. पण या कळपात किती हत्ती आहेत, हे सांगणं इतकं सोपं नाहीय.
कारण जवळपास ९९ टक्के लोकांचं उत्तर चुकलं आहे. आता एक टक्क्यामध्ये तुम्ही आहात का? तुमच्याकडे हत्तींना पाहण्याची तीक्ष्ण नजर आहे का? हे तुमचं तुम्ही शोधा. तुमच्याकडे ५ सेकंदांची वेळ आहे. या वेळेत तुम्ही बरोबर उत्तर दिलं, तर नक्कीच तुमचा समावेश बुद्धीमान माणसांमध्ये होईल, यात शंका नाही. इंटरनेटवर हत्तींच्या कळपाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत काही हत्ती पाणी पिण्यासाठी तलावाच्या किनाऱ्यावर उभे असलेले दिसत आहेत. तुम्हाला फक्त एव्हढच सांगायचं आहे की, या फोटोत तुम्हाला किती हत्ती दिसत आहेत? बुद्धीला चक्रावून टाकणाऱ्या या फोटोत चार हत्ती दिसत आहेत.
इथे पाहा फोटो
पण ज्यांनी चार हत्तींना पाहिलं आहे, त्यांचं उत्तर चुकलं आहे. हत्तींची बरोबर संख्या पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा कस लावावा लागेल. कारण ऑप्टिकल इल्यूजनच्या या मजेदार फोटोनं अनेकांना थेट हत्तींची एकूण संख्या सांगण्याचं आव्हानंच एकप्रकारे दिलं आहे. या फोटोत किती हत्ती आहेत, हे तुम्हाला अजूनही कळलं नसेल, तर तुम्हाला आम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगणार आहोत. तुम्हाला जरी विश्वास बसला नाही, तरी काही हरकत नाही. पण या फोटोत सात हत्ती आहेत. ज्यांना पाहण्यासाठी तुम्हाला गरुडासारखी नजर ठेवावी लागेल. ऑप्टिलक इल्यूजनच्या अशा फोटोंमुळं लोकांच्या आयक्यूची क्षमता कळते.