सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असत. हे व्हायरल व्हिडीओ, फोटो आपल्याला अनेकदा विचार करायला भाग पाडतात तर काही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. सोशल मीडियावर पोस्ट केल्या जाणाऱ्या या फोटो, व्हिडीओमुळे आपल्याला निसर्गातील, आकाशगंगेतील सुंदर दृध्य बघायला मिळतात. असाच एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शाज जंग या फोटोग्राफर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करून त्यांनी “किती डोळे दिसत आहेत?” असा प्रश्नही कॅप्शन दिलं आहे.
शाज जंग हे ‘निकॉन इंडिया’ आणि ‘सॅमसंग इंडिया’चे अँबेसेडर आहेत तसेच NatGeo साठी फोटोग्राफीचे संचालक व TheBisonKabini चे ओनर आहेत. शाज जंग हे वन्यजीव छायाचित्रकार आहे. शाज यांनी २७ ऑगस्टला “तुम्हाला किती डोळे दिसत आहेत? #thejungleiswatching” अशा कॅप्शनसह फोटो पोस्ट करत नेटीझन्सला चांगलच कामाला लावलं. हा फोटो इतका सुंदर आहे की नेतीझन्सनेही शाज यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर द्यायच ठरवलं.

तुम्हाला किती डोळे दिसतायेत ?

हे आहे उत्तर!

शाज जंग यांनी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये दोन प्राणी झाडावर चढून बसलेले दिसत आहेत. खरतर एकाला शोधन सोप्प आहे. पण दुसऱ्यासाठी मेहनत करावी लागतेय. झाडावर एक उजव्या आणि दुसरा डाव्या बाजूला बसलेल्या प्राण्याचे डोळे मिळून ४ डोळे या फोटोत आहेत.

photo

कमेंट्सचा पाऊस

शाज जंग यांच्या या फोटोवर नेटीझन्सने अनेक कमेंट्स केल्या आहेत. त्यांनी काढलेल्या या अमेझिंग फोटोसाठी त्याचं कौतुक केलं जात आहे. अनेकांनी उत्तरही दिले आहे. उत्तर देत देत त्यांच्या फोटोग्राफीचे कौतुक करत हा फोटो म्हणजे एक मास्टरपीस आहे असही म्हटले आहे. एका वापरकर्त्याने लिहले की, “कॅमेऱ्याच्या मागचे दोन डोळे आम्हाला या फोटोतील ४ डोळे पाहण्यास मदत करतात !!”जवळ जवळ ५०० लोकांनी हा फोटो रीट्विटही केला आहे.

Story img Loader