Optical Illusion: सोशल मिडीयावर अनेक गोष्टी रोज व्हायरल होत असतात. काही आपल्याला हसवतात तर काही फार विचार करायला भाग पाडतात. असाचं एक विचार करायला भाग पाडणारा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. अनेकदा ऑप्टिकल इल्युजन आणि कोडी सोडवायला लोकांना वेळ जातो. सध्या सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असाच एक फोटो खूप चर्चेत आहे. या फोटोतून तुम्हाला ९ चेहरे शोधायचे आहेत. आतापर्यंत अनेकजणांनी हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यापैकी फक्त १% लोकांनाच हे कोडं सोडवता आलं आहे. जर तुमची नजर देखील तीक्ष्ण असेल, तर तुम्ही देखील हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करा.

फोटो जवळून पहा

या फोटोत लपलेले चेहरे शोधून काढण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणे आवश्यक आहे. या फोटोमधून तुम्ही जितके अधिक चेहरे शोधू शकता, तितके चांगले तुमचे निरीक्षण कौशल्य मानले जाईल. जेव्हा तुम्ही चेहरे शोधण्यास सुरुवात कराल तेव्हा ३० सेकंदांचा टायमर सेट करण्यास विसरू नका. फोटोच्या मध्यभागी तुम्हाला तीन चेहरे सहज दिसतील.

( हे ही वाचा: Optical Illusion: लाल ठिपके जोडल्या नंतर तुम्हाला इंग्रजी अक्षर दिसले का? फक्त १% लोकांना देता आलं योग्य उत्तर)

चेहरे शोधणे इतके सोपे नाही

जर तुम्हाला ६ चेहरे दिसले तर तुमचे निरीक्षण सामान्य मानले जाईल. जर तुम्हाला ७ चेहरे दिसले तर ते सरासरीपेक्षा थोडे चांगले आहे आणि जर तुम्हाला ८ चेहरे दिसले तर तुमचे निरीक्षण कौतुकास पात्र आहे. परंतु जर तुम्हाला ९ चेहरे सापडले तर तुमच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची विलक्षण क्षमता आहे आणि तुम्ही एक सर्जनशील व्यक्ती आहात. जर तुम्हाला सर्व चेहरे सापडले नाहीत, तर बाकीचे चेहरे खालील फोटोमध्ये दाखवले आहेत.

( हे ही वाचा: Optical Illusion: या चित्रात लपलेले ५ पक्षी तुम्ही शोधू शकता का? फक्त १% लोकांनी दिले अचूक उत्तर)

फोटो व्हायरल होत आहे

या फोटोत इतके चेहरे शोधणे खरोखर कठीण आहे. फार कमी लोकांना हे सर्व ९ चेहरे शोधण्यात यश आले आहे. जर तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक असाल, तर अभिनंदन तुम्ही सुद्धा जीनियस लोकांच्या यादीत नक्कीच सामील झाला आहात. आता हे कोडे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना पाठवून जाणून घेऊ शकता.

Story img Loader