How to Manufacturing Matchbox Inside Factory: जगभरात आज काडीपेटीचा वापर केला जातो. भलेही आज बाजारात लायटर आले असले तरी काडीपेटीचा वापर आजही केला जातो. काडीपेटीला आगपेटी असेही म्हटले जाते. आगपेटी ही सहसा घरात स्वयंपाक करताना गॅस पेटवण्यासाठी किंवा दिवा लावण्यासाठी वापरली जाते. काही लोक काडीपेटीचा वापर सिगरेट पेटवण्यासाठीही वापरतात. छोट्याश्या पेटीत येणाऱ्या या काड्या क्षणार्धात जळून खाक होतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का? काडीपेटी कशी तयार होते? काडीपेटीतील या काड्या कशा तयार होतात. जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ नक्की पाहिला पाहिजे.
सोशल मीडियावर सध्या काडीपेटी तयार करणाऱ्या फॅक्ट्ररीतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. divulgamax_brasil नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, सर्वात आधी मोठ्या मोठ्या लाकडाचे एका ठराविक आकाराचे तुकडे केले जातात. त्याची साल सर्वात आधी काढली जाते. नंतर एका मशीनमध्ये ते टाकले जातात ज्यामध्ये लाकडाची एक सपाट आणि लांबसडक पट्टी(Paper Sheets) तयार होते. नंतर ते दुसऱ्या मशीनमध्ये जिथे त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. या तुकड्यांना उन्हात वाळवले जातात. त्यानंतप त्यावर ज्वलनशील पदार्थ लावला जातो ( जो काडीपेटीवर घासल्यामुळे आग लागते) शेवटी ते एका छोट्या पेटीत पॅक केले जातात.
हेही वाचा – तरुणाचा जबरदस्त ‘बेली डान्स’ पाहून नेटकरी म्हणाले, “कोण नोरा फतेही?”; पाहा Viral Video
हेही वाचा – कधीही पाहिली नसेल अशी फॅशन! बाजारात आले आता नागिन शूज, Viral Video पाहून बसेल धक्का
व्हायरल होतोय व्हिडिओ
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इतक्या छोटी काडीपेटी तयार करण्यासाठी किती मेहनत करावी लागते. व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत कित्येक लोकांनी पाहिला आहे. लोकांना हा व्हिडोओ आवडला आहे. लोक व्हिडीओ पाहून विविध प्रतिक्रिया देत आहेत.