How much a 1 and half ton air conditioner costs in Pakistan: दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईमुळे, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती भारताच्या तुलनेत खूपच जास्त आहेत. असेच एक उदाहरण म्हणजे १.५ टन एअर कंडिशनरची किंमत, जी भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये लक्षणीयरीत्या महाग आहे. प्रत्येकजण सांगतो की पाकिस्तानात याची किंमत एवढी आहे त्या वस्तूची किंमत एवढी आहे, पण तुम्हाला माहितीये का की पाकिस्तानात दीड टनचा एसी कोणत्या किंमतीत विकला जातो?

पाकिस्तानातील दीड टन एसीची किंमत

पाकिस्तानात दीड टनच्या एअर कंडिशनरची किंमत ४० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. टीसीएल पाकिस्तानच्या अधिकृत वेबसाइटवर दीड टनचा (18HEA-2) एसी PKR १४८,९०० (अंदाजे ४५,२५१ रुपये) ला विकला जात आहे. तर मेगा डॉट पीके वेबसाइटवर Haier कंपनीचा दीड टनचा एसी PKR १४९,९९९ (अंदाजे ४५,५८५ रुपये)ला मिळतो.

पाकिस्तानात या कंपन्या विकतात एसी

पाकिस्तानात टीसीएल, Haier यांच्यासह Kenwood, GREE सारख्या कंपन्या एअर कंडिशनर विकतात.

पाकिस्तानात १.५ टन एसीची किंमत

पाकिस्तानी वेबसाइट Daraz वर Kenwood कंपनीचा दीड टनचा एअर कंडिशनर PKR १५०,४९९ (अंदाजे ४५,७३७ रुपये) ला मिळतो. तर मेगा डॉट पीके वेबसाइटवर Gree कंपनीचा १.५ टनचा स्प्लिट एसी PKR २११,९९९ (अंदाजे ६४,४२७ रुपये) ला विकला जात आहे.

भारतातील दीड टन एसीची किंमत

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर दीड टनचा नवीन एअर कंडिशनर तुम्हाला ३० हजार रुपयांपेक्षा कमी सुरुवातीच्या किंमतीत मिळेल. फ्लिपकार्टच्या स्वतःच्या ब्रँड Marq चा दीड टनचा एसी २५,९९० रुपयांना विकला जात आहे. याशिवाय Onida कंपनीचा दीड टनचा एसी २८,४९० रुपयांना मिळतो. तर दुसरीकडे अॅमेझॉनवर क्रूज कंपनीचा दीड टनचा एसी २८,९९० रुपयांना विकला जात आहे.