Pune : पुणे हे देशातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी येथे शिकायला येतात. याशिवाय आयटी आणि मोठमोठ्या कंपन्यांसुद्धा पुण्यात आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुख्यालयाचे कार्यालय येथे आहेत.देशातील एक महत्त्वाचे आयटी हब म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शिक्षणच नाही तर नोकरीसाठी देशभरातून मुले पुण्यात येत असतात.
पुण्यात नव्याने येऊ पाहणाऱ्या अनेकांना प्रश्न पडतो की पुण्यात आरामात राहण्यासाठी किती पगार पुरेसा आहे? तु्म्हाला असा प्रश्न कधी पडला? सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यात राहण्यासाठी किती पगार पुरेसा आहे, असे विचारले आहे. त्यावर पुणेकर युजर्सनी एकापेक्षा एक भन्नाट उत्तरे दिली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे शहराविषयी तरुणाईमध्ये एक विशेष आकर्षण आहे. पुण्यात येऊन जॉब करण्याची स्वप्ने अनेक तरुण बघतात पण त्याचबरोबर पुण्यात राहण्यासाठी किती पगार पुरेसा आहे, असा प्रश्नही त्यांना पडतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये पु्ण्यातील एक रस्ता दाखवला आहे आणि या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये विचारलेय, “पुण्यात आरामात राहण्यासाठी किती पगार पुरेसा आहे” या व्हिडीओवर “सुख कळले कळले” हे लोकप्रिय गीत सुद्धा लावले आहेत. खरंच पुण्यात राहण्यासाठी किती पगार आवश्यक आहे? याचं उत्तर युजर्सनी दिले आहेत. अनेक पुण्याच्या युजर्सनी स्वत:च्या अनुभवातून याचे उत्तर दिले आहेत.

हेही वाचा : Mumbai Video : हिवाळ्यात मुंबईच्या सौंदर्यात पडते आणखी भर! तुम्ही हिवाळ्यात मुंबई पाहिली का?

maze.pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या प्रश्नावर अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “महिन्याला दहा लाख” तर एका युजरने लिहिलेय, “जास्त नाही पण २० हजार तरी निदान पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “पन्नास हजार” अनेक युजर्सनी वेगवेगळे आकडे टाकले आहेत.
एका युजरने लिहिलेय, “पैसा कितीही कमवा पण माणूस इथे आपली ओळख हरवून बसतो” तर एक युजर लिहितो, “पगार कितीही असू दे पण सुखी राहण्यासाठी आपले आईवडिल जवळ पाहिजे.”