Trending Mumbai Local : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत (Mumbai) मुसळधार पाऊस सुरू आहे. कितीही पाऊस पडला तरी कामाच्या निमित्ताने लोकांना घराबाहेर पडावं लागतं. पावसाळा सुरू झाला की, सर्वांत पहिल्यांदा आठवते ती म्हणजे छत्री. घराबाहेर पडल्यानंतर ही छत्रीच तुमची सोबती बनते. एक पावसाळा संपूर्ण एका छत्रीवर काढण्यासाठी तिची बरीच काळजी घ्यावी लागते. पावसात छत्री वापरल्यानंतर ती बंद करण्यापूर्वी आधी तिला पूर्ण सुकवावी लागते आणि मग बंद करावी लागते. अन्यथा छत्रीच्या तारा गंजून तुटू लागतात. मग दुसऱ्या छत्रीचा खर्च आलाच. या व्हायरल व्हिडीओमधल्या पठ्ठ्याने लोकलमध्ये छत्री सुकवण्यासाठीची ही अनोखी शक्कल शोधून काढलीय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.

मुंबईच्या मुसळधार पावसात लोकल ट्रेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एक व्यक्ती चक्क छत्री सुकवताना दिसून येतोय. कोणतीही अडचण असू द्यात, त्यावर जुगाड शोधण्यात मुंबईकर सगळ्यात पुढे असतात, असं विनोदाने म्हटलं जातं. याचीच प्रचिती देणारा हा व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. भर पावसात लोकलमध्ये बसल्या बसल्या छत्री सुकवण्यासाठी व्यक्तीने शोधून काढलेल्या या युक्तीचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जातंय.

आणखी वाचा : Lalit Modi-Sushmita Sen च्या नात्यावर जबरदस्त मीम्सचा वर्षाव, वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल

पावसाळ्यात छत्री हीच एक गोष्ट आहे जी आपल्याला प्रत्येक ठिकाणी मदतीची ठरते. मग घराबाहेर पडल्यानंतर ही छत्री सुकवायची कशी? असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. ओली छत्री तशीच बंद करून ठेवली की मग त्या खराब होणार आणि मग पुन्हा नवीन छत्रीचा खर्च अंगावर पडणार, मग नेहमी नवीन छत्रीसाठी खर्च कोण करणार? म्हणून मुंबईकरांनी यावर चांगला उपाय शोधून काढलाय.

आणखी वाचा : तुम्ही कधी ऑक्टोपसला खेळताना पाहिलंय का? मग हा गोंडस VIRAL VIDEO एकदा पाहाच!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती लोकलमध्ये खिडकीच्या बाजुला बसलेला दिसून येतोय. त्याने आपली छत्री खुली करून लोकलच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या दिशेने पकडून बसलेला आहे. लोकलमधून जस जसा वारा येतोय तस तसं हा व्यक्ती आपली छत्री फिरवत ती सुकी करताना दिसून येतोय. सोबतच खिडकीतून अंगावर येणारं पावसाचं पाणी सुद्धा पडत नाही. आहे की नाही मुंबईकरांनी शोधलेला भन्नाट उपाय…

आणखी वाचा : मॅनहोलमध्ये पिल्लाला पडलेलं पाहून हत्तीण बेशुद्ध! बचाव मोहिमेचा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : तुम्ही कधी ऑक्टोपसला खेळताना पाहिलंय का? मग हा गोंडस VIRAL VIDEO एकदा पाहाच!

लोकलमध्ये छत्री सुकवतानाचा हा व्हिडीओ dadarmumbaikar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ‘लोकलमध्ये छत्री सुकवण्याची ही नींजा टेक्नीक’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर कऱण्याचा मोह आवरता येत नाहीय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. ‘हे फक्त मुंबईतच होऊ शकतं’ असं देखील काही युजर्स म्हणत आहेत.

Story img Loader