बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा उल्लेख करताना चुकले, ते योगी आदित्यनाथ म्हणण्याऐवजी आदित्य योगीनाथ म्हणाले. मोदीं यांना असा उल्लेख करताच सोशळ मीडियावर योगी आदित्यनाथ यांची चर्चा सुरु झाली.

उत्तर प्रदेशमधील विविध ठिकाणाची नावं बदलल्यामुळे योगी आदित्यनाथ याधीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय होते. आता पंतप्रधानांकडून त्यांचं नाव घेताना चूक झाल्यामुळे ते पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले आहेत. प्रभू राम मंदिरच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर बोलताना मोदी म्हणाले की, “उत्तर प्रदेशचे ऊर्जावान, यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ जी.” पीएम मोदी यांच्या या वक्तव्यानंतर योगी आदित्यनाथ ट्विटरवर चर्चेचा विषय झाले. ट्विटरवर ते दिवसभऱ ट्रेंडिंगमध्ये होते. नेटकरी यावर आपापल्या प्रतिक्रिया देत होते.

२०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर येथील अनेक प्रसिद्ध ठिकाणांची नांवं बदलण्यात आली. अनेक नेटकऱ्यांनी हाच धागा पकडत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यानंतर इलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज, फैजाबाद तसेच ऐतिहासिक मुगलसराय रेल् स्थानकाचं नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय असं केलं आहे.

Story img Loader