Viral Video : प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. कुत्रा पाळणारे लोक त्यांच्या कुत्र्यांचे अनेक व्हिडीओ शेअर करीत असतात. असे म्हणतात की, कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक प्राणी आहे आणि प्रामाणिकपणा हा कुत्र्याकडून शिकावा. पण, सध्या कुत्र्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल की, संयमी कसे व्हावे हेसुद्धा कुत्र्याकडून शिकावे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा त्याच्या मालकाबरोबर रस्त्यावरून जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे कुत्र्याने मालकाची छत्री तोंडात पकडली आहे. अचानक मालकाला वाटेत कोणी मित्र भेटतो आणि मालक त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे; पण त्यादरम्यान कुत्रा तोंडात छत्री घेऊन मालकाची वाट पाहत आहे. हा कुत्रा बराच वेळ मालकाची वाट बघत तेथेच थांबतो; पण तोंडातली छत्री काही खाली ठेवत नाही. कुत्र्याची ही संयमी वृत्ती पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.
हेही वाचा : बापरे! हिरवळ पाहत शेतात बसला होता तरुण, अचानक मागे आला साप अन्…थरारक व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
कधी कधी पाळीव प्राणीसुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात. कुत्रा हा माणसाचा एक चांगला सखा किंवा मित्र म्हणून ओळखला जातो. या व्हिडीओतून तुम्हाला दिसेल की, मालकाबरोबर कुत्र्याची खास मैत्री आहे. त्याच्या वागण्यातून संयमशीलता आणि प्रामाणिकपणा दिसून येतो.
sahaara_by_mansi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती प्रामाणिक कुत्रा आहे.” तर एका युजरने लिहिले आहे, “माणसापेक्षाही जास्त प्रामाणिक असतो कुत्रा.” आणखी एका युजरने लिहिले, “म्हातारपणात मालकाजवळ खूप चांगला मित्र आहे.”