महाराष्ट्राची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीचा एक व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका एसटी बसचालकाने चालकाला बसमध्ये चढायचे कसे असा प्रश्न विचारला आहे आणि नव्या बसमध्ये दरवाजा एकीकडे आणि पायऱ्या दुसरीकडेच असल्याचा दावा केला आहे. व्हिडीओमध्ये या बसचालकाने बसमध्ये चढणे कसे अवघड जात आहे हे देखील दाखवले आहे. कालपासून हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आल्याचा दावा करणारा नवा व्हिडिओ समोर आला आहे. एसटी बसमध्ये कसे चढावे हे याचे प्रात्यक्षिक एका चालकाने करून दाखवले आहे. नव्या व्हिडीओमध्ये चालकांना एसटीबसमध्ये चढता येत नाही हा दावा खोटा ठरवला आहे.
दरवाजा आणि पायऱ्यांची रचना चुकीच्या पद्धतीने केल्याने चालकांना बसमध्ये चढता येत नाही असा दावा एका एसटी बस चालकाने एका व्हिडीओमध्ये केला आहे. व्हिडीओमध्ये त्याने दाखवले की, बसचा दरवाजा एकीकडे आणि पायऱ्या दुसरीकडेच आहेत ज्यामुळे बसचालकांना बसमध्ये चढायचे कसा असा प्रश्न पडतो. पण हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात असल्याचा दावा करणारा नवा व्हिडिओ चर्चेत आला आहे. नव्या व्हिडीओमध्ये, त्या प्रकारच्या बसमध्ये एक एसटी बस चालक बसमध्ये कसे चढायचे हे दाखवतो. नव्या व्हिडिओतील चालक प्रथम दरवाजा उघडतो आणि दिलेल्या पायऱ्यांवर एक पाय ठेवतो आणि दरवाज्याला पकडून टायरच्या इथे पाय ठेवण्यासाठी एक लोखंडी बार दिला आहे त्यावर पाय ठेवतो आणि बसमध्ये सहज चढतो असे दाखवले आहे.
हेही वाचा –साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
लालपरीचा नवा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करून आपले मत मांडले आहे.
एकाने लिहिले की, “दुसरी पायरी काय झोपायला दिली आहे का? भ्रष्टाचार झालाय मान्य करा”
दुसऱ्याने म्हटले,”तरी पण(बसमध्ये चढणे) अवघड वाटत आहे.”
तिसऱ्याने म्हटले की, चुकीची गोष्ट बरोबर सिद्ध करत आहेत”
चौथा म्हणाला की,”दरवाजा चुकीच्या बाजूने उघडायची पद्धत आहे. पायऱ्या बरोबर आहेत, डाव्या बाजूला उघडा मग बरोबर होईल.”
पाचवा म्हणाला की, “चुकून दरवाजा उलटा बसवला गेला”
हेही वाचा –खाली डोके, वर पाय….चक्क शीर्षासन करतोय ‘हा’ हत्ती! Viral Video पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
सहावा म्हणाला की, “मग वरची पायरी कशाला दिलेली आहे, मी सुद्धा ४ वर्षे एसटीमहामंडाळामध्ये काम केलंय मला महिती आहे एसटी बसची रचना किती चुकीच्या आहेत ते. उगाच लोकांना मूर्ख नका बनवू, झालेल्या चुका मान्य करून त्यात सुधारणा कशी करावी याचे विचार करा”