Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. काही लोक त्यांना आलेले चांगले वाईट अनुभव शेअर करताना दिसतात. सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध आजी दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला ‘ही आज्जी तरुणपणी कशी दिसत असेल?’ असे विचारले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल?
ishajagtap07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून इशा जगताप या तरुणीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आज्जी दिसेल. या आजीचे डोळे अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर आणि हाता पायावर सुरकुत्या पडल्यावर दिसत आहे. त्या सुरकुत्या पाहून तुम्हाला या आज्जीच्या वयाचा अंदाज येऊ शकतो. व्हिडीओत तरुणीने पुढे विचारलेय, ही आज्जी तरुणपणी कशी दिसत असेल? तुम्ही कधी विचार केला ही आज्जी तरुणपणी कशी णीदिसत असावी. पुढे या व्हिडीओत तरुणी सांगते, “मी तिचे काही जुने फोटो पाहिले आणि थक्क झाले” त्यानंतर व्हिडीओमध्ये या आज्जीचा जुना फोटो दाखवला आहे. हा फोटो जुना असून त्या वेळी आजी आजोबांनी जोडीने हा फोटो काढला आहे. त्या फोटोमध्ये आज्जी खूप जास्त सुंदर दिसतेय. तिची सुंदरता पाहून तुम्ही आताच्या अभिनेत्रींना विसराल. सध्या हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
या तरुणीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजी-आजोबा, बालपणीचे जीवलग मित्र!” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दिवसागणिक कसा चेहरा बदलतो, शरीर थकतं, ताकत कमी होते.. अनुभवाची गाठोडी भरत जाते, अनेक गोष्टी हातातून निसटून जातात, काही, सोडून द्याव्या लागतात, काही नवीन गोष्टी तयार होतात, पण निसटून गेल्याचं काहीसं दुःख मनाच्या कोपऱ्यात राहून जातं, आणि त्याबरोबर जे आहे त्यांच्यासाठी विसरण्याचा प्रयत्न सुरू होतो…. जसं एक झाड उभं आहे त्याला नवीन पालवी येतं असते, तर जुनी पाने गळूनपडत असतात, पण ते झाड स्तब्ध उभं असतं, सगळं बघत असतं.. अनुभव घेत असतं… असो! किती बोलणार? “आनंदी रहा!” एवढं बोलून आपण पुढे जावं… सुखी रहा, आनंदी रहा…” तर एका युजरने लिहिलेय, “आजी तिच्या काळातली जयश्री गडकर” तर एका युजरने लिहिलेय, “किती भारी दिसत आहे आजी”
आणखी एका युजरने लिहिलेय, “आजी तिच्या काळातली ऐश्वर्या राय दिसते” एक युजर लिहितो, “आजोबा पण काही कमी नाहीत. हँडसम हिरो. लय भारी जोडी” एक युजर लिहितो, “खरोखरचं खूप सुंदर होत्या आजीबाई जुने लोकं साधे राहूनही खूप सुंदर दिसायचे” तर एक युजर लिहितो, “अस्सल सौंदर्य” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd