आपल्या कुटुंबियांप्रमाणेच आपले जिवलग मित्रही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण आपल्या आईवडिलांना सांगू शकत नाही, पण आपण आपल्या मित्राला त्या गोष्टी आवर्जून सांगतो. चांगले मित्र कधीही आपल्या परिस्थितीवरून आपली पारख करत नाहीत. ते आपल्याबरोबर असतील तर आपल्या सर्व समस्या दूर होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच भारतातील प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी खरा मित्र कसा असावा आणि मैत्रीचे महत्त्व काय, हे अवघ्या चार ओळींमध्ये समजावून सांगितले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहुयात.

आपल्या पोस्टमध्ये हर्ष गोएंका यांनी खऱ्या मित्रांबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय –

” तुमचे मित्र कोण आहेत हे खूप महत्वाचे आहे –

जे ध्येयाबद्दल बोलतात त्यांच्याबरोबर रहा,
ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे त्यांच्याबरोबर रहा,
जे तुम्हाला नेहमी सत्य सांगतात त्यांच्याबरोबर रहा,
त्यांच्याबरोबर रहा जे नेहमी तुमच्यासाठी उभे राहतील.”

Viral Video: उडायचा कंटाळा आला म्हणून सीगल पक्ष्याने केला भन्नाट जुगाड; अनोखा स्टंट पाहून नेटकरीही चक्रावले

आयुष्यात चांगला मित्र असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण खरा मित्र आपल्या कठीण काळात आपल्याबरोबर उभा राहतो, तो आपल्या चुकांवर कधीही पांघरून घालत नाही आणि आपल्या आनंदाच्या काळात त्याच्या इतका आनंद कुणालाही होत नाही. हर्ष गोएंका यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. लोकांना ही पोस्ट आवडली असून ते कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to be a true friend in just four sentences harsh goenka explained the importance of good friendship pvp