तुम्ही जर अंडी खात असाल तर तुम्हाला माहित असेल तरी अंडी खाण्याचे विविध पद्धत आहे. कोणी अंड फोडून त्याचे ऑम्लेट करते तर कोणी अंड उकडवून खाते. सहसा पाण्यात उकळवून अंडी उकडली जातात पण तुम्हाला माहितीये का पाण्याशिवाय तुम्ही अंडी उकडवू शकता. होय हे शक्य आहे. अंडी उकडवण्यासाठी एक हटके जुगाड आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो जो सहसा गावाकडे वापरला जातो. सोशल मीडियावर पाण्याशिवाय अंडी उकडवतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाण्यात अंडी न टाकता कशा प्रकारे ते उकडवता येऊ शकतात. व्हिडीओच्या सुरुवातीला एक व्यक्ती, मातीमध्ये थोडेसे पाणी टाकून त्याचा चिखल तयार करताना दिसते. त्यांनतर तयार चिखल अंड्यावर सर्व बाजूंनी लावला जातो. त्यानंतर लाकूड आणि शेणाच्या गौऱ्या जाळल्या जातात. त्यामध्ये हे चिखल लावलेले अंड भाजण्यासाठी टाकले जाते. काही काळ त्या विस्तवावार अंडी चांगली खरपूस होईपर्यंत भाजली की त्यातून बाहेर काढली जातात. अंड्यावर लावलेला चिखल कडक झालेला दिसतो जो हाताने सहज काढका येईल. त्यासह उकडलेल्या अंड्याचे कवच देखील वेगळे होईल. अशा प्रकारे पाणी न वापरता तुमची उकडलेली अंडी तयार आहेत. उकडलेल्या अंड्याचे काप करून त्यावर चिरलेला कांदा, कोंथिबिरी आणि शेव टाकून खाऊ शकता किंवा अंडा करी बनवू शकता. अशाप्रकारे भाजलेल्या अंड्याची चव अप्रतिम असते.

हेही वाचा – धावत्या ट्रकमध्ये चोरट्यांनी केली चोरी, तेही बाईकवर उभे राहून; कॅमेऱ्यात कैद झाली घटना, व्हायरल होतोय व्हिडीओ

हेही वाचा – परीक्षेत ‘कॉपी’ करण्यासाठी विद्यार्थ्याने वापरल्या चक्क १०-२० रुपयांच्या नोटा, ‘कॉपी’ची नवी पद्धत पाहून शिक्षकही चक्रावले

व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहे. व्हिडीओ पाहून अनंकाच्या तोंडाला पाणी सुटले आहे. व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर लोक विविध प्रतिक्रिया देत आहे. एकाने सांगितले की, “म्हणूनच त्याला गोबरबख्त म्हणतो” तिसरा म्हणाला की, शहरात जन्मलेले लोक विविध खाद्य संस्कृतीचा आदर का नाही करत? प्रत्येक खाद्यसंस्कृती त्याच्यानुसार बदलू शकत नाही.” तिसऱ्याने सांगितले, :पदार्थाचे नाव, अंडा भात” चौथ्याने लिहिले, त्याची चव खूप भारी असणार आहे , माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांनी पाण्याशिवाय अंडी उकडवली आहे. मला माहितीये तुम्हाला हे पाहून विचित्र वाटत असे पण त्याची चव खरंच खूप चांगली असणार आहे. त्याला स्मोकी चव येते. पाचवा म्हणाला, राजस्थामध्ये अशा प्रकारे अंडी उकडवली जातात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to boiled eggs without water roast egg using mud and gobar video goes viral snk
Show comments