Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर जु्न्या गोष्टींना उजाळा मिळतो तर काही व्हिडीओ पाहिल्यानंतर काही गोष्टी नव्याने कळतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वेफर्सचे पॅकेट कसे फोडावे, हे दाखवले आहे. व्हिडीओ पाहून काही लोक अवाक् होतील कारण त्यांना कदाचित पहिल्यांदा कळले असले की वेफर्सचे पॅकेट असे फोडावे तर काही लोकांना एका विशिष्ट वयात आल्यानंतर कळले असेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच तुफान व्हायरल होत आहे. एका लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. (How to break a packet of wafers At what age did you learn wafers packet should break like this video viral)

तुम्ही आजवर अनेक लोकांना वेफर्सचे पॅकेट फोडताना पाहिले असेल, पण तुम्ही कधी असे वेफर्सचे पॅकेट फोडता का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की वेफर्सचे पॅकेट कसे फोडावे? तर तुम्हाला त्यासाठी हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –

पॅकेटच्या मागच्या बाजूला तुम्हाला वर काळ्या रंगाची पट्टी मध्यभागी दिसेल. ती पट्टी हलक्या हाताने खालीपर्यंत ओढायची. अशाप्रकारे तुम्ही सहज वेफर्सचे पॅकेट फोडू शकता. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्हाला वयाच्या कितव्या वर्षी समजले?”

हेही वाचा : मगरीने महाकाय अजगराला जबड्यात पकडून गरगर फिरवले अन्…, पुढे जे घडलं ते फार भयानक; पाहा धडकी भरवणारा Video

वेफर्सचे पॅकेट असे फोडावे, पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीत ट्रॅक्टरवर चढून नाचणाऱ्या आजींचा नवा Video चर्चेत, “बुगडी माझी सांडली गं”गाण्यावर सादर केली लावणी

viralgoshtireals या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आताच आणि याच क्षणी वयाच्या 35 व्या वर्षी” तर एका युजरने लिहिलेय, “आता जाते किराणा दुकानामध्ये आणि कुरकुरे पॅकेट आणून ट्राय करते असं…” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला आजच कळलं हे अस पण असतं…. १८ सप्टेंबर २०२४…५.४० मिनिटांनी”
एक युजर लिहितो, “व्हिडिओ बघितला नसता तर अजून दातानेच तोडून खाल्लं असतं” अनेक युजर्सनी त्यांना ही ट्रिक आताच समजली, असे लिहिलेय.