How To Save Plants From Drying Out: बहुतेकदा लोक रोपच्यांना जिवंत ठेवण्यासाठी त्यांना पाणी देतात. गरजेनुसार सूर्यप्रकाश दिला जातो. झाडांची वेळोवेळी छाटणी करतात. परंतु अनेकदा खूप काळजी घेतल्यानंतरही रोपं सुकून जातात आणि खराब होऊ लागतात. त्यानंतर लोक त्यांना घराबाहेर फेकून देतात किंवा खराब रोपटे उपटून नवीन लावतात. तुमच्यासोबतही असं अनेकदा घडलं असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, सुकलेल्या रोपांना पुन्हा ताजेतवाने आणि हिरवेगार स्वरूप दिले जाऊ शकते?
खरं तर, इंग्लंडमधील एका महिलेने सुकलेल्या आणि वाळलेल्या रोपांना पुन्हा हिरवे करण्यासाठी ‘ ‘Genius’ Hack वापरला आहे. या महिलेच्या बागेत ठेवलेली अनेक झाडे सुकली होती, ज्यामुळे संपूर्ण बागेचे रूप खराब होत होते. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, इंग्लंडमधील रहिवासी लिसा हार्वे यांना खूप दुःख होते की तिची अनेक रोपं खराब होत आहेत आणि त्यांची हिरवळ कुठेतरी हरवत आहे.
हेही वाचा – ‘हीच खरी माणूसकी!’ तारेमध्ये अडकलं घुबड, ‘असा’ वाचवला त्याचा जीव! पाहा अंगावर काटा आणणार Video
रोपांना वाचविण्यासाठी लढवली अतरंगी शक्कल
या रोपांना फेकून द्यावे लागून नये आणि त्यांना पुन्हा हिरवीगार करण्यासाठी लिसाने तिची शक्कल लढवली. तिच्या या युक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. लिसाने पाण्याचा वापर केला नाही किंवा रोपटयांमध्ये हिरवळ परत आणण्यासाठी खत किंवा माती बदलण्याचा विचार केला नाही. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तिने चक्क हिरव्या रंगाच्या स्प्रे पेंटचा वापर केला.
हेही वाचा – ऐकावं ते नवलंच! झाडांना पाणी घालताना ‘टॉपलेस’ असते ‘ही’ महिला कारण….; लोक म्हणे, ”हा तर पब्लिसिटी स्टंट”
अन् रोप पुन्हा झाली हिरवीगार
लिसाने तिच्या बागेतील दोन वाळलेल्या रोपांना हिरव्या रंगाच्या स्प्रे पेंटने रंगवले. स्प्रे पेंट फवारल्यानंतर रोप अशी दिसू लागली जणू ते अगदी ताजी आणि जिवंत आहेत. जरी ही रोप सुकली होती. पण स्प्रे पेंटच्या साहाय्याने त्यांचे स्वरूप जिवंत रोपट्यासारखे झाले होते. लिसाने बागेत ही रोपे सजवली. ताज्या वनस्पतींमध्ये ही वाळलेली झाडे ओळखणे देखील कठीण होत आहे. आता सर्वजण लिसाच्या या ‘जिनियस’ हॅकचे कौतुक करत आहेत. एक युजर म्हणाला, ‘काय कल्पना आहे. मला माझ्या गवतासाठी देखील हे उपा. आवश्यक आहे. कारण माझ्या कुत्र्याने ते खराब केले.’