How To Buy National Flag Online : अवघ्या पाच दिवसानंतर भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे. घरात तिरंगा झेंडा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासारखा आनंद कुठेच मिळणार नाही. देशाप्रती सार्थ अभिमान आणि प्रेम दाखवण्याची ही सुवर्णसंधी आहे. या स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून मुलांना तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याचं महत्व सांगू शकता. यंदाही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून ‘हर घर तिरंगा’ मोहीमेला आणखी मजबूत करुया. १३ आणि १५ ऑगस्ट दरम्यान तुम्ही तुमच्या घरात तिरंगा झेंडा फडकावून देशाप्रती असलेलं प्रेम दाखवा. घरात तिरंगा झेंडा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा करुन तुम्हीही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हा, असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
‘हर घर तिरंगा’ मोहीमेच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिन करा साजरा
हर घर तिरंगा मोहीमेच्या माध्यमातून भारतीय डाक सेवेकडून तिरंगा झेंडा देण्यात येणार आहे. या तिरंग्याचा आकार २० x ३० इंच असणार आहे. हा तिरंगा २५ रुपयांत खरेदी करता येणार आहे. तुम्ही एकावेळी ५ तिरंगा झेंडे ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची डिलिव्हरी फी द्यावी लागणार नाहीय. याबाबत पोस्ट विभागाकडून ट्वीटरवर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असं म्हटलंय की, भारतीय डाक विभागाकडून देशभरात १.६० लाख पोस्ट विभागात तिरंगा झेंड्याचं वाटप करण्यात येणार आहे. १३ आणि १५ ऑगस्ट दरम्यान शासनाकडून हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येणार आहे. भारतीय नागरिक तिरंगा झेंडा डाक विभागाच्या माध्यमातून खरेदी करू शकतात.
‘अशा’ पद्धतीने तिरंगा झेंडा ऑनलाईन खरेदी करु शकता
१) इंडियन पोस्ट वेबसाईटवर (epostoffice.gov.in क्लिक करा.
२) तुमची माहिती भरा आणि अकाऊंट क्रिएट करा.
३) तुमचं अकाऊंट लॉग इन करा आणि प्रोडक्ट्स (Products) सेक्शनमध्ये क्लिक करा.
४) नॅशनल फ्लॅग (National Flag) वर क्लिक करा आणि तुमच्या कार्टवर अॅड करा.
५) बाय नाऊ (Buy Now) वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर अॅड करा.
६) मोबाईलवर पाठवलेला OTP व्हेरिफाय करा.
७) प्रोसिड टू पेमेंटवर क्लिक करा.
इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये तिरंगा कसा खरेदी करु शकता?
तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन २५ रुपयात तिरंगा झेंडा खरेदी करु शकता.
‘या’ गोष्टींची काळजी घ्या
तुम्ही तिरंगा झेंडा खरेदी केल्यावर तुम्हाला योग्य ठिकाणी तिरंगा फडकवावा लागेल. योग्य ठिकाणी तिरंगा फडकवला गेला पाहिजे. उदा. तुमच्या घरासमोर किंवा घराच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये तुम्ही तिरंगा झेंडा फडकावू शकता. तुम्ही फडकवलेल्या तिरंग्याचा पोल उंच असेल याची काळजी घ्या. कारण उंच पोलवर तिरंगा फडकावल्यावर तो खूप चांगल्या पद्धतीनं पाहता येईल.