आई-वडिलांसारखेच शिक्षक हे आपल्या गुरुस्थानी असतात. शिक्षक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवतात. काय चूक काय बरोबर हे शिकवण्याबरोबरच आयुष्याची गणितं कशी सोडवायची ते शिकवतात. ज्ञानाचा सागर असलेले आपले शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतात.

शिक्षणाबरोबरच शिक्षकांवर एक मोठी जबाबदारी असते ती म्हणजे त्यांना योग्य ती शिस्त, संस्कार आणि चांगली सवय लावण्याची. आजकाल अनेक लहान मुलं मोबाइलच्या आहारी गेले आहेत. मोबाइलशिवाय ते सुखाचा जेवणाचा घासही घेत नाहीत. सगळ्या गोष्टींसाठी त्यांना मोबाइल हवा असतो. म्हणून आजच्या पिढीतील लहान मुलांना लागलेली ही सवय घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी शिक्षकांनी एक आगळा वेगळा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वीही झाला.

मुलांना असं ठेवा मोबाईलपासून दूर

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तुमच्या लहान मुलाला मोबाईलपासून कायमच दूर ठेवू शकता. या व्हिडीओमध्ये काही शिक्षकांनी अभिनय करून मुलांना मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी खास संदेश दिला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका शिक्षिकेच्या डोळ्याला लागलं असतं, त्यातून रक्त येत असतं. आणि तसाच रक्ताने भरलेला कापूस डोळ्यावर धरून दुसरी शिक्षिका त्या शिक्षिकेला घेऊन मुलांसमोर येते.

मुलांसमोर येताच दुसरी शिक्षिका जखमी झालेल्या शिक्षिकेला विचारते, “तुम्हाला नेमकं काय झालं, अचानक डोळ्यातून रक्त का येत आहे.” तर यावर शिक्षिका म्हणते, “सकाळ, संध्याकाळ मी फोन बघत असते म्हणून डोळ्यातून रक्त येऊ लागलं. आता मला हा फोन नको.” असं म्हणत ती फोन दुसऱ्या शिक्षिकेला देते. यावर शिक्षिका मुलांना प्रश्न विचारते, की “तुमच्यापैकी कोण कोण फोनचा वापर करत, आता कराल का वापर” यावर मुलं म्हणतात, “यापुढे आम्ही फोनचा वापर करणार नाही.”

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @commentrrr या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला “आजच्या पिढीसाठी मोबाईल फोनला नाही म्हणा” (say no to mobile phones for today’s generation) अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल ८९ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं की, “खूप चांगल्या पद्धतीने हा एक चांगला संदेश आहे.”. दुसऱ्यानं कमेंट करत लिहिलं की, “शिक्षकांनी अगदी चांगल्याप्रकारे मुलांना समजवलं आहे” तर तिसऱ्यानं, “वाह्ह, खूप छान उपक्रम” कमेंट केली.

Story img Loader