Ration Card Update : आज देशातील बहुसंख्य लोकांकडे शिधापत्रिका (रेशन कार्ड) आहे. रेशन कार्डचे तीन प्रकार आहेत. त्यापैकी केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिकेच्या आधारे गरिबांना स्वस्तात धान्य मिळते. तसेच इतरही अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी शिधापत्रिकेची गरज असते. विशेषत: विशिष्ट कागदपत्र बनविण्यासाठीही शिधापत्रिकेची आवश्यकता असते. त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्डप्रमाणेच शिधापत्रिका हाही महत्त्वाचा पुरावा मानला जातो.

त्यामुळे शिधापत्रिकेवर तुमचा अधिकृत मोबाईल नंबर नोंदविणे फार महत्त्वाचे आहे. जर तुमच्या शिधापत्रिकेमध्ये जुना किंवा चुकीचा मोबाईल नंबर असेल, तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Ration Card e-KYC process in marathi
रेशनकार्डधारकांनो ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण करा KYC अन्यथा धान्य मिळणं होईल बंद; कशी करायची केवायसी? घ्या जाणून
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
How to Update New mobile Number in Ration Card
नवीन मोबाइल नंबर घेतलाय, मग तो रेशन कार्डमध्ये अपडेट कसा करायचा? जाणून घ्या
Indian culture Cambodia: ९०० वर्षे जुनी द्वारपालांची शिल्पं सापडली; कंबोडियात उलगडला भारतीय शिल्पकलेचा वारसा!
From March 2025 new 108 Ambulance available on mobile app
‘१०८ रुग्णवाहिका’ आता ॲपद्वारे दारात, पत्ता सांगण्याचीही आवश्यकता नाही
Gujarat diamond factory manager dies during rape bid of 14-yr-old girl
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा

शिधापत्रिकेवरील रजिस्टर मोबाईल नंबरवर काही वेळा OTP येतो. जर नंबर अपडेट केला नसेल, तर तो OTP येणार नाही आणि तुम्हाला सरकारी योजनांचा लाभही घेता येणार नाही, त्यामुळे शिधापत्रिकेवर चुकीचा किंवा बंद असलेला मोबाईल नंबर असेल, तर तो लगेच अपडेट करणे गरजेचे आहे.

आम्ही तुम्हाला आठ सोप्या पायऱ्या सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही शिधापत्रिकेवरील तुमचा मोबाईल नंबर सहजपणे अपडेट करू शकता. आता हे सर्व काम ऑनलाइन झाल्यामुळे शिधापत्रिकेवरील मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याचा त्रास घ्यावा लागणार नाही. फक्त आठ स्टेप्स फॉलो करुन तुम्ही शिधपत्रिकेवरील तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता.

त्यासाठी प्रत्येक राज्याची स्वतःची वेबसाइट आहे. त्यामुळे तुम्हाला त्या त्या वेबसाइटवर जाऊन, तुमची शिधापत्रिका करावे लागेल. दिल्लीच्या वेबसाइटचे उदाहरण देत आम्ही तुम्हाला ही अपडेटची प्रक्रिया समजावून सांगतो.

शिधापत्रिकेवर मोबाईल नंबर कसा अद्ययावत करायचा?

१) सर्वप्रथम National Food Security Portal च्या वेबसाइटवर जा, ती वेबसाइट- nfs.delhi.gov.in अशी आहे.

२) वेबसाइटवर ‘Citizen’s Corner’ नावाचा सेक्शन आहे, तिथे जाऊन ‘Register/Change of Mobile No.’ वर क्लिक करा.

3) त्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल.

४) आता घरातील प्रमुखाचा NFS आयडी टाका. जर तो नसेल, तर तुमचा आधार क्रमांक टाकला तरी चालेल.

५) आता येथे तुमचा शिधापत्रिका क्रमांक टाका.

६) शिधापत्रिकेवर ज्या घरातील प्रमुखाचे नाव लिहिलेले आहे, त्याचे नाव टाका.

७) आता सर्वांत महत्त्वाची पायरी येते; येथे तुमचा नवीन मोबाईल नंबर टाका. नंतर ‘Save’ पर्यायावर क्लिक करा.

८) आता तुमचा नवीन मोबाईल नंबर तुमच्या शिधापत्रिकेवर अद्ययावत केला जाईल.

इंटरनेटशिवायही शिधापत्रिकेवर करा मोबाईल नंबर अपडेट

जर तुम्हाला शिधापत्रिकेवरील मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट करण्यात अडचणी येत असतील, तर हे काम तुम्ही ऑफलाइनदेखील करू शकता. तुम्हाला थेट अन्न विभागात जाऊन तुमचा अर्ज सादर करावा लागेल. त्याचबरोबर शिधापत्रिका आणि आधार कार्डाच्या फोटोकॉपीही द्याव्या लागणार आहेत. त्यानंतर काही दिवसांत तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डासह अद्ययावत होईल.

Story img Loader