Viral video: आपल्या जुन्या पारंपारिक दुर्मिळ होत चाललेल्या वस्तूंपैकी एक वस्तू ती म्हणजे दगडी खलबत्ता…पूर्वी हा दगडी खलबत्ता घरोघरी असायचा पण आता तो क्वचितच पाहायला मिळतो..खलबत्ता विकत घेतल्यानंतर लगेच त्याला आपण वापरु शकत नाही. कारण त्यामध्ये माती, धूळ तशीच असते. त्यामुळे त्याला व्यवस्थित स्वच्छ करावं लागते. मात्र याची स्वच्छ करायची सुद्धा एक विशिष्ठ पद्धत आहे. आज अशाच काही पद्धती आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. यामुळे तुम्ही खलबत्त्यामध्ये तुम्हाला हव ते बारीक करु शकता किंवा त्याचा उपयोग करु शकता. सोशल मीडियावर यासंदर्भातला एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. तुम्हालाही हा व्हिडीओ खूप उपयोगी पडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ खरंच खूप उपयोगाचे असतात. असाच हा व्हिडीओ. दगडी खलबत्ता वापरण्यासाठी कसा तयार करावा हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा..

अशा पद्धतीनं नवीन दगडी खलबत्ता स्वच्छ करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, खलबत्ता स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी त्यात पाणी टाका आणि हाताने स्वच्छ करा, मग आपल्या भांडी घासायच्या काथ्याने त्याला पाणी टाकून घासा. कोणताही साबण याठिकाणी लावू नका. त्यानंतर तांदूळ टाका आणि खलबत्यात ते बारीक करुन बारीक झालेली तांदळाची पेस्ट खलबत्त्याला संपूर्णपणे चोळा. आणि शेवटी पुन्हा पाण्याने धुवून घ्या. यानंतर या व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे लसणाच्या दोन पाकळ्या गॅसवर करपवून घ्या आणि त्या खलबत्यात टाका वरुन मीठ टाका. आता ते खलबत्यातच बारीक करा आणि त्याची पावडर संपूर्ण खलबत्याला लावा आणि पाण्याने स्वच्छ धुवा.

आता सर्वात शेवटचं म्हणजे हळद घ्या, ही हळद खलबत्यात टाका आणि संपूर्ण खलबत्याला लावून १० मिनीटे तसेच ठेवा आणि नंतर धुवा. अशाप्रकारे तुमचा नवा खलबत्ता वापरण्यासाठी तयार आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: दिल्ली मेट्रो स्टेशनवर गर्दीचा फायदा घेत अवघ्या २ मिनिटांत लुटलं; या महिला टोळीची हातचलाखी बघून व्हाल अवाक्

सोशल मीडियात व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @vegauthentic या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to clean new khalbatta the stone grinder before using first time know about video viral srk
Show comments